Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zim vs SA : क्रिकेट विश्वात तहलका! दक्षिण आफ्रिकेच्या Wian Mulder चे विश्वविक्रमी त्रिशतक

दक्षिण आफ्रिकेची धुरा सांभाळणाऱ्या वियान मुल्डरने सोमवारी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पणात त्रिशतक झळकावले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 07, 2025 | 05:43 PM
Zim vs SA: Shocking moment in the cricket world! South Africa's Wian Mulder scores world record triple century

Zim vs SA: Shocking moment in the cricket world! South Africa's Wian Mulder scores world record triple century

Follow Us
Close
Follow Us:

South Africa’s Wian Mulder sets world record as captain : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा ३३६ धावांनी विजय मिळवत इतिहास घडवला आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्वविक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेची धुरा सांभाळणाऱ्या वियान मुल्डरने सोमवारी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण करून इतिहास रचला आहे.  कर्णधार म्हणून पदार्पण करताना पहिल्या डावात त्रिशतक झळकवणारा मुल्डर हा कसोटी इतिहासातील पहिला खेळाडू बनला आहे.

पहिल्या डावात मुल्डरने नाबाद २६४ धावा काढल्यानंतर त्याने ती धावसंख्या तीन अंकी आकड्यांपर्यंत नेली. त्याने २९७ चेंडूत आपले पहिले त्रिशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात जलद त्रिशतक ठरले आहे. याआधी भारताचा वीरेंद्र सेहवागने  जलद त्रिशतक पूर्ण केले होते. त्याने २००८ मध्ये चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७८ चेंडूत ३०० धावा फटाकवल्या होत्या.

हेही वाचा : IND Vs ENG : गिल सेनेचा एजबॅस्टन विजय हेवा वाटणारा; पाकिस्तानचा कित्येक वर्ष जुना विक्रम उध्वस्त; वाचा सविस्तर

मुल्डरकडून एका डावात विक्रमांची बरसात

मुल्डरने न्यूझीलंडच्या ग्रॅहम डोलिंगचा विक्रम मोडीत काढला आहे. ज्याने १९६९ मध्ये भारताविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पणात २३९ धावा काढल्या होत्या. त्याने २००३ मध्ये इंग्लंडविरुद्ध २७७ धावा करणाऱ्या ग्रॅमी स्मिथचा विक्रम मोडीत काढला होता.  आता मुल्डर दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यासोबतच, त्याने गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध ३१० चेंडूत त्रिशतक झळकावणाऱ्या हॅरी ब्रूकचा देखील विक्रम मोडला आहे.

हा मुल्डर त्याचा २१ वा कसोटी सामना खेळत आहे.  तो दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा हाशिम अमला नंतरचा दुसरा खेळाडू बनला आहे. मुल्डरची ही खेळी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी ऐतिहासिक बनली आहे.

कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा (दोन्ही डाव एकत्रित)

  1. ३६७ – वियान मुल्डर वि. झिम्बाब्वे, २०२५ (आतापर्यंत)
  2. २५६ – विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया, २०१४
  3. २४४ – ग्रॅहम डोलिंग वि. भारत , १९६८
  4. २३२ – ग्रेग चॅपेल वि. डब्ल्यूआय, १९७५
  5. २१२ – अ‍ॅलिस्टर कुक󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 वि. बांगलादेश, २०१०

कसोटी इतिहासात एकाच दिवशी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1. ३०९ – डॉन ब्रॅडमन वि. इंग्लंड󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 १९३०
  2. २९५ – वॉली हॅमंड वि. न्यूझीलंड १९३३
  3. २८४ – वीरेंद्र सेहवाग वि. श्रीलंका २००९
  4. २७३ – डेनिस कॉम्प्टन वि. पाकिस्तान १९५४
  5. २७१ – डॉन ब्रॅडमन वि. इंग्लंड १९३४
  6. 264* – विआन मुल्डर वि.  झिम्बाब्वे 2025*
  7. 257 – वीरेंद्र सेहवाग वि. दक्षिण आफ्रिका 2008

हेही वाचा : MS Dhoni हा सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा भारतीय कर्णधार! रोहित शर्मा मागे? जाणून घ्या यादी

 

Web Title: Zim vs sa south africas wian mulder scores world record triple century against zimbabwe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • Wiaan Mulder

संबंधित बातम्या

ZIM vs SA : ४०० धावांजवळ पोहचूनही मोडला नाही ब्रायन लाराचा विक्रम, वियान मुल्डरने केला मोठा खुलासा; पहा Video
1

ZIM vs SA : ४०० धावांजवळ पोहचूनही मोडला नाही ब्रायन लाराचा विक्रम, वियान मुल्डरने केला मोठा खुलासा; पहा Video

SA VS ZIM : दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे 367 रन, झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 170 धावांवर गडाडला, वाचा सामन्याचा अहवाल
2

SA VS ZIM : दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे 367 रन, झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 170 धावांवर गडाडला, वाचा सामन्याचा अहवाल

SA vs ZIM : वियान मुल्डरने द्विशतक झळकावून पलटलं रेकाॅर्ड बुक! जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला हा पराक्रम
3

SA vs ZIM : वियान मुल्डरने द्विशतक झळकावून पलटलं रेकाॅर्ड बुक! जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला हा पराक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.