टिम इंडिया-टिम पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
Team India breaks Pakistan’s record : भारतीय कसोटी संघाने एजबॅस्टन मैदानावर इतिहास रचला आहे. भारत आणि इंग्लंड या दोन संघात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दूसरा कसोटी सामना भारताने जिंकला आहे. काल ६ जुलैची रोजी भारताने इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने अनेक विक्रम रचले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत टीम इंडियाने ही मोठी कामगिरी करून दाखवली आही. प्रत्यक्षात, ६ जुलै रोजी एजबॅस्टन मैदानावर कसोटी स्वरूपात पहिल्यांदाच इंग्लंडचा पराभव करण्यात गिल सेना यशस्वी ठरली आहे.
या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये शानदार कामगिरी केली आहे. शुभमन गिलने आपले नेतृत्व सिद्ध केले. यामुळेच टीम इंडिया बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे ऐतिहासिक विजय पदरी पाडू शकले. या विजेयासह भारताने त्यानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. याशिवाय शुभमन गिलने पाकिस्तानी संघाचा एक जुना विक्रम देखील मोडलाया आहे.
हेही वाचा : MS Dhoni हा सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा भारतीय कर्णधार! रोहित शर्मा मागे? जाणून घ्या यादी
एजबॅस्टन येथील विजयासह भारताने पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक जुना विक्रम मोडीत काढला आहे. आता टीम इंडिया हा सेना देशांमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा संघ ठरला आहे. या दरम्यान, त्याने पाकिस्तानचा विक्रम मोडलाया आहे. एजबॅस्टनमधील विजयाने भारताने सेना देशात आपला 30 वा विजय नोंदवलाया आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाने सेना देशांमध्ये एकूण 29 कसोटी सामने आपल्या नावे केल आहेत.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. विशेषतः दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध, संघ त्यांच्याच देशात चांगले आव्हान देत आहे. हे सर्व देश एकत्रितपणे सेना देश म्हणून परिचित आहे. या दोन्हीमध्ये आशियाई संघांचा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. आता मात्र भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडून पुढे पाऊल टाकले आहे.
हेही वाचा : भारतात रंगणार जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेचा थरार! जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी लावणार बोली
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा ३३६ धावांणी धुव्वा उडवला आहे. यादरम्यान, कर्णधार शुभमन गिलने दोन्ही डावात शानदार शतक झळकावले. त्याने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावात १६१ धावा केल्या. त्याच वेळी, भारताकडून आकाश दीपने गोलंदाजीत १० बळी घेतले. तर, मोहम्मद शरीफने एकूण ७ फलंदाजांना आपली शिकार बनवले.