Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZIM vs SL, T20 World Cup : विश्वचषकातील सर्वोत्तम झेल पाहिलात का? दुसऱ्या क्षेत्ररक्षकावर उडी घेत टिपला अद्भुत झेल; पाहा VIDEO

टी२० विश्वचषकात २०२६ मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात १९ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये सामना खेळला गेला. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात  दासुन शनाकाने एका संस्मरणीय झेल घेऊन सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 20, 2026 | 03:30 PM
ZIM vs SL, T20 World Cup: Have you seen the best catch of the World Cup? Amazing catch taken by jumping over the other fielder; Watch VIDEO

ZIM vs SL, T20 World Cup: Have you seen the best catch of the World Cup? Amazing catch taken by jumping over the other fielder; Watch VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Dasun Shankar’s best catch of T20 World Cup 2026 : २०२६ च्या टी२० विश्वचषकात अनेक वेळा क्षेत्ररक्षण करताना खेळाडू आपले लक्ष वेधून घेतात. यामध्ये काही झेल असे असतात की, ते आपले मन देखील जिंकतात. २०२६ च्या टी२० विश्वचषकात असाच एक झेल बघायला मिळाला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात  दासुन शनाकाने एका संस्मरणीय झेल घेऊन चांगलीच प्रसिद्धी मिळवली. श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात १९ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने श्रीलंकेचा पराभव करून मोठा अपसेट केला, परंतु शनाकाच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.

हेही वाचा : भारत अ महिला संघाने Women’s Asia Cup Rising Stars च्या फायनलमध्ये मारली एन्ट्री! विजेतेपदाच्या लढतीसाठी पाकिस्तानशी सामना होणार?

शनकाचा अफलातून झेल

झिम्बाब्वेला शेवटच्या १२ चेंडूत १३ धावांची आवश्यकता होती. तेव्हा सिकंदर रझा आणि ब्रायन बेनेट क्रीजवर उपस्थित होते. १९ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रझा बाद माघारी गेला. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर ताशिंगा मुसेकिवाने एक शक्तिशाली शॉट टोलवला आणि चेंडू सीमारेषेकडे जाऊ लागला होता, त्यानंतर शनाका विरुद्ध दिशेने सुमारे २५ मीटर धावला. आणखी एक खेळाडूही झेल घेण्यासाठी येत होता, पण शनाकाने त्याला थांबण्याचा इशारा केला आणि तो अफलातून झेल घेतला. हा झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

रोमांचक सामना

एकाच षटकात दोन विकेट पडल्याने सामन्याचा निकाल  श्रीलंकेच्या बाजूने लागेल असे वाटत होते. तथापि, शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला ८ धावांची आवश्यकता असताना  पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक एकर आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून झिम्बाब्वेने सामना आपल्या खिशात टाकला.  १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, झिम्बाब्वेने दमदार सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये ब्रायन बेनेट आणि तादिवानाशे मुरुमानी यांनी ५५ धावांची भागीदारी केली. मुरुमानी ३४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रायन बर्लने २३ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : सामन्यादरम्यान इफ्तारची वेळ झाली…अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने मैदानावरच सोडला उपवास

ब्रायन बेनेटने महत्त्वपूर्ण ६० धावा केल्या, तर सिकंदर रझाने २६ चेंडूत ४५ धावा करून संघाला विजयाच्या जवळ पोहचवले. या प्रभावी खेळींमुळे झिम्बाब्वेला स्पर्धेतील आणखी एक मोठा अपसेट मिळाला.

Web Title: Zim vs sl t20 world cup dasun shanaka takes the best catch of the world cup watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Dasun Shanaka
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

AUS vs OMA : विश्वचषकाचा शेवटचा लीग सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या Live Streaming ची सविस्तर माहिती
1

AUS vs OMA : विश्वचषकाचा शेवटचा लीग सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या Live Streaming ची सविस्तर माहिती

T20 World Cup 2026 : सामन्यादरम्यान इफ्तारची वेळ झाली…अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने मैदानावरच सोडला उपवास
2

T20 World Cup 2026 : सामन्यादरम्यान इफ्तारची वेळ झाली…अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने मैदानावरच सोडला उपवास

Brian Bennett : 2026 च्या T20 विश्वचषकाचा असा ओपनर ज्याला कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यत आऊट करता आले नाही…
3

Brian Bennett : 2026 च्या T20 विश्वचषकाचा असा ओपनर ज्याला कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यत आऊट करता आले नाही…

AUS vs OMAN : ओमानसमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान! लीग सामन्याचा शेवटचा विजय कोणाच्या हाती लागणार?
4

AUS vs OMAN : ओमानसमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान! लीग सामन्याचा शेवटचा विजय कोणाच्या हाती लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.