Zimbabwe's Brendan Taylor creates history in ODI cricket! He becomes the first player to achieve this feat in the 21st century
Brendan Taylor creates history in ODIs : झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली याहे. या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या दरम्यान झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलरने मोठ्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. २१ व्या शतकात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये ब्रेंडन टेलर हा सर्वात जास्त एकदिवसीय कारकिर्दीचा खेळाडू बनला आहे. यासह त्याने इतिहास रचला आहे.
ब्रेंडन टेलर ४ वर्षांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. टेलरने सप्टेंबर २०२१ मध्ये आयर्लंडविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने एकदिवसीय कारकिर्दीची २० एप्रिल २००४ रोजी बुलावायो येथे श्रीलंकेविरुद्ध खेळून केली होती. झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून २१ वर्षे आणि १३२ दिवस झाले असून इतिहास रचला आहे.
झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने त्याचा संघ सहकारी शॉन विल्यम्सला देखील मागे टाकले आहे. २१ व्या शतकातील पदार्पणात सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या टेलरने शॉन विल्यम्स (१९ वर्षे आणि ३०० दिवस) ला पिछाडीवर टाकले आहे. यासह तो आता २० वर्षांहून अधिक काळ खेळणारा तो झिम्बाब्वेचा पहिलाच खेळाडू बनण्याचा विक्रम केला आहे.
आया कामगिरीसह ब्रेंडन टेलरने सर्वाधिक एकदिवसीय कारकिर्दी असलेल्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या तीनमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. २२ वर्षे आणि ९१ दिवसांच्या कारकिर्दीसह, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यादीत अव्वल स्थानी कायम आहे, तर श्रीलंकेचा महान फलंदाज सनथ जयसूर्या (२१ वर्षे आणि ८४ दिवस) दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा : India vs China : Hockey Asia cup मध्ये भारताची विजयी सलामी! हरमनप्रीत सिंगच्या हॅटट्रिकने भेदली चीनची भिंत
मॅच फिक्सिंगशी संपर्क आल्याची सूचना न दिल्याबद्दल जानेवारी २०२२ मध्ये ब्रेंडन टेलरवर आयसीसीकडून बंदी घालण्यात आली होती. टेलर साडेतीन वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा संघात पुनरागमन करत आहे. यापूर्वी टेलरने कसोटी सामन्यांमध्ये पुनरागमन केले होते. ३९ वर्षीय ब्रेंडन टेलरची एकदिवसीय कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने २०५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ शतके आणि ३९ अर्धशतकांसह ६६८४ धावा फटकावल्या आहेत.