भारतीय हॉकी संघ(फोटो-सोशल मीडिया)
India vs China Hockey Asia Cup 2025 : हॉकी आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. या स्पर्धेत भारताने चीनचा ४-३ असा पराभव केला आहे. खेळाच्या मध्यंतराला भारतीय संघाची पकड थोडी कमकुवत असल्याची दिसून आली होती. यावेळी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने जोरदार मुसंडी मारली आणि भारताला सामना जिंकून दिला.
हॉकी आशिया कप स्पर्धेत भारताने सलामी सामन्यात चीनविरूद्ध दमदार कामगिरी केली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने हॅटट्रिक लगावात भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने सामन्याच्या २०व्या, ३३व्या आणि ४७व्या मिनिटाला गोल केले. त्याच वेळी, भारताकडून जुगराज सिंगने पेनल्टीमध्ये गोल करून भारताचा विजय निश्चित केला. चीनच्या डू शिहाओने पहिला, चेन बेनहाईने दुसरा आणि गाओ जिशेंगने तिसरा गोल केला. या सामन्यातील सर्व मिळून ७ गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले आहेत.
हेही वाचा : २१ वर्षीय फलंदाजाचा दुलीप ट्रॉफीमध्ये धुमाकूळ! दानिश मालेवारचे नॉर्थ ईस्टविरुद्ध द्विशतकी तडाखा
चीनकडून पहिला गोल
या सामन्यातील पहिला गोल चीनकडून करण्यात आला. भारताने आपला आक्रमक खेळ दाखवत सुरुवात केली. सुरुवातीला भारताला २ पेनल्टी कॉर्नर मिळाले परंतु भारतीय खेळाडू त्यांचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरले. तथापि, या संधीचा फायदा घेत १३ व्या मिनिटाला चीनच्या डू शिहाओने पेनल्टी कॉर्नरद्वारे आपला पहिला गोल केला.
भारताकडून जुगराजने डागला पहिला गोल
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पहिला गोल १८ व्या मिनिटाला केला आणि चीनसोबत बरोबरी साधली. जुगराज सिंगने भारताकडून पहिला गोल केला. भारतीय संघाचा पहिला गोल देखील पेनल्टी कॉर्नरद्वारे आला. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनी २० व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने गोल करून आपल्या संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर ३३ व्या मिनिटाला हरमनप्रीतकडून भारतासाठी तिसरा गोल करण्यात आला. या गोलनंतर भारतीय संघाच्या आशा वाढल्या असताना भारताने आता दोन गोलची आघाडी घेतली. या गोलनंतर भारतीय संघ ३-१ असा आघाडीवर होता. येथून भारताचा खेळ मंदावला आणि याचा फायदा चीनने घेतला आणि परिणामी क्वार्टरमध्ये चीनने २ गोल करण्यात यश मिळवले. चीननेही सलग दोन गोल करून सामन्यात चांगले पुनरागमन केले. आता स्कोअर ३-३ असा बरोबरीत असताना भारताने ४७ व्या मिनिटाला आणखी एक गोल करून सामना खिशात टाकला.