Social Media Ban in Nepal: नेपाळमध्ये बॅन केले हे सोशल मीडिया अॅप्स! काय आहे बंदीचे कारण, सर्वकाही जाणून घ्या सविस्तर
नेपाळमध्ये तब्बल 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात आता नेपाळमधील रस्त्यांवर जनरेशन जेड (Gen Z) तरूणांचे आंदोलन सुरु झाले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात नेपाळमधील तरूणांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बॅन केल्यामुळे तरूणांचा संताप अनावर झाला आणि अखेर तरूणांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनादरम्यान 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. सरकारने हा निर्णय का घेतला, कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
नेपाळ सरकारने तब्बल 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फेसबुक, मेसेंजर, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, रेडिट, डिस्कॉर्ड, पिंटरेस्ट, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, क्वोरा, टंबलर, क्लबहाऊस, रंबल, मी व्हिडिओ, मी वायके, लाइन, इमो, जालो, सोल आणि हम्रो पॅट्रो यांचा समावेश आहे. खरं तर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरूणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. अशाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे तरूणांचा संताप अनावर झाला आहे आणि हजारो तरूण आता नेपाळमधील रस्त्यांवर आंदोलन करत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
सरकारने 4 सप्टेंबर रोजी फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सअॅपसह एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं कारण म्हणजे या 26 सोशल मीडिया कंपन्यांनी नेपाळच्या सूचना आणि संचार मंत्रालयात नोंदणी केली नव्हती. सरकारने सांगितलं आहे की, हे पाऊल फक्त “नियमांचे पालन करण्यासाठी” आहे, परंतु तरुण आणि विरोधी पक्षांचा असा विश्वास आहे की हा असहमतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता तरूणांनी आंदोलन सुरु केलं आहे.
नेपाळ सरकारने 28 ऑगस्ट रोजी सर्व मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना 7 दिवसांचा कालावधी दिला होता. सरकारने सांगितलं होतं की, सर्व प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांना नेपाळमध्ये नोंदणी करण्यासाठी, तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्यासाठी आणि देशात अधिकृत संपर्क कार्यालय उघडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. मात्र फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, ट्विटर (एक्स), रेडिट आणि लिंक्डइन सारख्या कोणत्याही मोठ्या कंपन्यांनी अंतिम मुदतीपर्यंत अर्ज केला नाही. यामुळे सरकारने कठोर पाऊलं उचलत हे 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बॅन करण्याचा निर्णय घेतला.
अशी माहिती मिळाली आहे की, टिकटॉक, व्हायबर, विक्टोक, निंबझ आणि पोपो लाईव्ह या कंपन्यांनी नेपाळ सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन रजिस्ट्रेशन केले आहेत. त्यामुळे या पाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली नाही. 2023 मध्ये नेपाळनेही टिकटॉकवर बंदी घातली होती. नंतर, जेव्हा कंपनीने नोंदणी करण्यास सहमती दर्शविली, तेव्हा 2024 मध्ये ही बंदी उठवण्यात आली.