पैसे घेऊनही प्राइम व्हिडिओवर जाहिराती दिसणार? Amazon चे नियोजन आहे तरी काय? जाणून घ्या
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ भारतात प्राईम मेंबर्सना देखील लवकरच जाहिराती दाखवण्यास सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. जाहिरात व्यवसाय वाढवण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षापासून प्राईम व्हिडिओ युजर्सना चित्रपट आणि वेबसिरीजमधील जाहिराती पाहाव्या लागतील. वापरकर्त्यांसाठी एक जाहिरात मुक्त पर्याय देखील असेल परंतु त्यांना त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. एमएक्स प्लेयर खरेदी केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा- 6000 mAh बॅटरीसह लाँच झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी
जर तुमच्याकडे अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन असेल, तर तुम्ही देखील आतापर्यंत जाहिरातींशिवाय चित्रपट आणि वेबसिरीजचा आनंद घेतला असेल, पण आता लवकरच यामध्ये व्यत्यय येणार आहे. कंपनी लवकरच प्राइम व्हिडिओ यूजर्ससाठी जाहिराती देण्याची योजना करत आहे. कंपनी लवकरच भारतात प्राईम व्हिडिओ मेंबर्सना जाहिराती दाखवण्यास सुरुवात करेल. हा निर्णय अनेक देशांमध्ये लागू करण्यात आल्या असून अनेक देशांमध्ये आधीच जाहिराती दिसू लागल्या आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
जाहिरात व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचललं आहे. रिपोर्टनुसार, पुढील वर्षापासून यूजर्सला प्राइम व्हिडिओवर चित्रपट किंवा वेबसीरिज पाहताना जाहिराती पाहाव्या लागतील. युजर्सला ॲड फ्री ऑप्शन देखील मिळेल, पण यासाठी त्यांना आतापेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनी काही नवीन योजना देखील आणणार आहे. ज्याची माहिती लवकरच मिळू शकेल.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, मेक्सिको, स्पेन आणि यूके सारख्या देशांमध्ये प्राईम व्हिडिओ मेंबर्सना जाहिराती दिसू लागल्या आहेत. आता कंपनी भारतासह आणखी अनेक देशांमध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात करणार आहे. या देशांमध्ये ब्राझील, जपान, नेदरलँड आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की व्हिडिओच्या मध्यभागी जाहिराती दर्शविण्यामागील उद्देश आपला महसूल वाढवणे आहे. पैशांमुळे कंपनीच्या बिझनेस मॉडेलवर परिणाम होऊ नये म्हणून हे केले जात आहे.
हेदेखील वाचा- वाय-फायचा पासवर्ड विसरलात? कळजी करण्याची गरज नाही, या टीप्स वापरून पाहा
ॲमेझॉनने म्हटले आहे की इतर OTT च्या तुलनेत जाहिराती कमी असतील. जरी आम्ही चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये जाहिराती दाखवण्याचा विचार करत असलो तरी आमचे जाहिरात धोरण इतर स्ट्रीमिंग कंपन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. जाहिराती येथे दाखवल्या जातील, परंतु त्यांची संख्या इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत खूपच कमी असेल.
ॲमेझॉनने असेही स्पष्ट केले आहे की प्राइम व्हिडिओवर जाहिराती दाखवण्यापूर्वी यूजर्सना ईमेलद्वारे कळवले जाईल की कंपनी असे करणार आहे. युजर्सना जाहिराती दाखवण्याबाबत काही आठवडे अगोदर माहिती दिली जाईल. कंपनीने असेही म्हटले आहे की सध्या प्राइम मेंबरशिपमध्ये बदल करण्याची कोणतीही योजना नाही. सध्याचे 1499 रुपयांचे सबस्क्रिप्शन असेच उपलब्ध राहील. कंपनीने MX Player खरेदी केल्यानंतर जाहिरात दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. आता MX Player देखील कंपनीच्या डिजिटल जाहिरात महसुलात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.