वाय-फायचा पासवर्ड विसरलात? कळजी करण्याची गरज नाही, या टीप्स वापरून पाहा
आजकाल प्रत्येक घरात इंटरनेट आणि वाय-फाय सुविधा आहे. काही काळापूर्वी, लोक त्यांच्या फोनमध्ये इंटरनेट रिचार्ज करायचे, परंतु आता वाय-फायला अधिक प्राधान्य दिलं जातं. कारण वाय-फायच्या मदतीने घरातील अनेक डिव्हाईस एकाच वेळी कनेक्ट करता येतात आणि त्यामुळे इंटरनेट वापरणं तुलनेने स्वस्त होतं. इतकंच नाही तर वाय-फायचा स्पीडही खूप चांगला आहे, त्यामुळे डाऊनलोडिंग, सर्चिंग वगैरे करणे अधिक सोयीचे आहे.
हेदेखील वाचा- FUJIFILM ची नवी वाइड अँगल PL माऊंट झूम लेन्स लाँच, ब्रॉड कास्ट इंडिया ईव्हेंटमध्ये केली घोषणा
परंतु वाय-फायला कोणत्याही डिव्हाईस सोबत कनेक्ट होण्यासाठी पासवर्ड आवश्यक असतो. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल किंवा तुम्ही तो विसरलात तर तुमच्या फोनला किंवा लॅपटॉपला वायफाय कनेक्ट करणं कठीण होतं. पण अशावेळी काळजी करण्याची गरज नाही, कारण अशा अनेक पद्धती आहेत ज्यांच्या मदतीने वाय-फाय पासवर्ड शोधला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – pinterest)






