Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गजब Technology! AI मुळे झाली महिला गरोदर, 20 वर्षांनी घरात हलणार पाळणा

जवळजवळ २० वर्षे बाळासाठी संघर्ष केल्यानंतर, महिलेला अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे. १५ अयशस्वी आयव्हीएफ उपचारांनंतर, AI-आधारित प्रजनन साधनाने आश्चर्यकारक काम केले. याचे नाव STAR आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 19, 2025 | 12:36 PM
AI मुळे 20 वर्षानंतर मिळणार महिलेला आई होण्याचे सुख (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

AI मुळे 20 वर्षानंतर मिळणार महिलेला आई होण्याचे सुख (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

Follow Us
Close
Follow Us:

न्यूयॉर्कमधील एका जोडप्याची कहाणी आज जगभरात चर्चेचा विषय ठरते आहे. सुमारे 20 वर्षे बाळासाठी संघर्ष केल्यानंतर, त्यांना अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे. 15 वेळा आयव्हीएफ उपचार अयशस्वी झाले, अनेक खंडातील तज्ज्ञांचा सल्ला या जोडप्याकडून घेण्यात आला होता, परंतु प्रत्येकवेळी ते अयशस्वी झाले. पण जेव्हा आशेचे सर्व किरण मावळत होते, तेव्हा कोलंबिया विद्यापीठात तयार केलेल्या AI आधारित प्रजनन उपकरणाने आश्चर्यकारक काम केले असल्याचे आता समोर येत आहे. 

या उपकरणाचे नाव स्टार (स्पर्म ट्रॅक अँड रिकव्हरी) आहे, ज्याने वंध्यत्वाच्या उपचारात एक क्रांतिकारी वळण आणले असल्याचे आता जगात समोर आले आहे. नक्की काय घडले आहे आणि याचा उपयोग कसा करण्यात आला याची माहिती आपण या लेखातून घेऊया. हे केवळ वैद्यकीय प्रगती नाही तर तंत्रज्ञान, संयम आणि मानवी भावनांचाही विजय आहे. ही कहाणी लाखो जोडप्यांसाठी आशेचा एक नवीन किरण आहे जे मूल नसल्याच्या दुःखातून जात आहेत. (फोटो सौजन्य – Google Gemini AI) 

काय आहे STAR आणि कसे करते काम?

STAR ही एक AI प्रणाली आहे जी सामान्यतः शुक्राणू नसलेल्या वीर्य नमुन्यांमध्येदेखील जिवंत शुक्राणू शोधते, सामान्य स्वरूपात यात स्पर्म दिसत नसले तरीही AI च्या या उपकरणामुळे स्पर्म शोधण्यास मदत मिळते. 

  • यामध्ये एक मायक्रोफ्लुइडिक चिप वीर्यातील घटकांचे वर्गीकरण करते
  • एक हाय-स्पीड इमेजिंग सिस्टम लाखो सूक्ष्म फ्रेम रेकॉर्ड करते
  • एक मशीन लर्निंग अल्गोरिदम या प्रतिमांचे विश्लेषण करते आणि लपलेले शुक्राणू ओळखते

डॉक्टर ज्याला “गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधणे” म्हणतात, ते STAR काही तासांतच साध्य करते आणि इतक्या काळजीपूर्वकपणे हे साध्य केले जाते की, शुक्राणू IVF मध्ये वापरण्यासाठी सक्षम राहतात आणि महिला गरोदर होऊ शकतात

‘या’ व्यसनापायी महिलांमध्ये येतंय वंध्यत्व आणि पुरूष होत आहेत नपुसंक, 3 व्यवसांपासून रहा दूर

कसे झाले शक्य

न्यूयॉर्कमधील या जोडप्याच्या बाबतीत, सामान्य प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांना दोन दिवसांपर्यंत नमुन्यात एकही शुक्राणू सापडला नाही. परंतु STAR ला फक्त एका तासात 44 जिवंत शुक्राणू आढळले. त्यानंतर, मार्च 2025 मध्ये कोणत्याही पुढील शस्त्रक्रिया किंवा हार्मोनल उपचारांशिवाय IVF करण्यात आला आणि तो यशस्वी झाला. आता हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाच्या आगमनाची वाट पाहत आहेत 

जेव्हा आशा मावळल्यासारखे वाटले तेव्हाच या जोडप्याने डॉ. झेव्ह विल्यम्स, कोलंबिया विद्यापीठातील प्रजनन तज्ज्ञ यांच्या संपर्कात आले आणि या डॉक्टरांच्या टीम एक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत होती ज्याचे नाव आहे स्पर्म ट्रॅक आणि रिकव्हरी आणि याचाच वापर करण्यात आला. 

Career In AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे? Google-Microsoft सह या कंपन्या ऑफर करतायत टॉप-5 फ्री कोर्स

Azoospermia: पुरुषांमधील वंध्यत्वाचे छुपे कारण

या प्रकरणात, पतीला अ‍ॅझोस्पर्मिया होता, म्हणजेच वीर्यामध्ये शुक्राणू आढळत नाहीत. Azoospermia चे दोन प्रकार आहेत:

  1. Obstructive – शुक्राणू तयार होतात पण बाहेर येऊ शकत नाहीत 
  2. Non-Obstructive – शुक्राणू शरीरात तयार होत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात तयार होतात.

त्याची कारणे – अनुवांशिक रोग, कर्करोग उपचार, हार्मोनल असंतुलन, ड्रग व्यसन किंवा शरीराच्या रचनेतील असामान्यता. आज STAR फक्त शुक्राणू ओळखण्यास मदत करते, परंतु भविष्यात AI या क्षेत्रांमध्ये देखील मदत करू शकते:

  • उच्च दर्जाचे Eggs आणि भ्रूण ओळखणे 
  • IVF यशस्वी होण्याच्या शक्यतेचा अंदाज
  • वैयक्तिकृत उपचार योजना
  • पुनरुत्पादक ऊतींमधील सूक्ष्म दोष शोधणे

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Ai helped woman got pregnant after 20 years failed fertility treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Pregnant woman
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन
1

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
2

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
3

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
4

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.