हा आहे Airtel चा बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन, 60 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे खाास बेनिफिट्स! एवढी आहे किंमत
Airtel ने गेल्या वर्षी जुलैमध्ये आपल्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले होते. इतर खाजगी कंपन्यांप्रमाणे Airtel चे प्लॅनही 25 टक्क्यांनी महाग झाले आहेत. यानंतर, कंपनीने नवीन व्हॅलिडीटसह अनेक लोकप्रिय प्लॅन त्यांच्या यादीत समाविष्ट केल्या आहेत. Airtel देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. Airtel चे करोडो युजर्स आहेत. Airtel युजर्सना अमर्यादित कॉलिंग आणि इतर फायद्यांसह अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करतो.
Boat Smartwatch: प्रीमियम लुक आणि जबरदस्त फीचर्ससह Boat स्मार्टवॉच लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली Airtel त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच उत्तम ऑफर घेऊन येत असते. आता देखील आम्ही तुम्हाला Airtel च्या एका प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. खरं तर हा प्लॅन जुनाच आहे. पण अनेकांना याबद्दल माहितीच नाही. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या 60 दिवसांच्या व्हॅलिडीटसह येणाऱ्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Airtel कंपनी तिच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त एकच प्रीपेड प्लॅन देते जो 60 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करतो. तथापि, हा एक असा प्लॅन आहे जो अमर्यादित 5G डेटा बंडलसह येत नाही. म्हणून जर तुम्ही Airtel चा 60 दिवसांचा प्लॅन शोधत असाल तर तुम्हाला 5G इंटरनेटशिवाय काम करावे लागेल. आपण येथे ज्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलत आहोत त्याची किंमत 619 रुपये आहे. कंपनीचा हा प्लॅन काही नवीन नाही. जरी या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G चा फायदा मिळत नसला तरी, त्यात मनोरंजनाचे फायदे देखील आहेत.
Airtel च्या 619 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 1.5 जीबी दररोज डेटा मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 60 दिवसांची आहे. या प्लॅनसोबत Airtel एक्सस्ट्रीम प्ले हा अतिरिक्त मनोरंजनचा फायदा मिळणार आहे. Airtel च्या मालकीचे एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे जे सोनीलिव्ह आणि इतर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेट एकत्रित करते. एक्सस्ट्रीम प्ले अॅक्सेस असलेले युजर्स त्यांचे सर्व आवडते टीव्ही शो आणि चित्रपट एकाच लॉगिनने पाहू शकतात.
Google चा मोठा निर्णय! Gmail चा पासवर्ड रिसेट करताना आता नाही येणार SMS, ‘ही’ असेल नवीन कोड सिस्टम
Airtel चा 84 दिवसांचा प्लॅन रिचार्ज प्लॅन 979 रुपयांना ऑफर केला जातो. या प्रीपेड प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, युजर्सना यामध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. याशिवाय, युजर्सना संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो. एवढेच नाही तर त्यात मोफत राष्ट्रीय रोमिंगसह इतर अनेक फायदे दिले जातात. यामध्ये, वापरकर्त्यांना दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा मिळतो. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये युजर्सना 5G नेटवर्कवर अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील दिला जाईल. या प्लॅनमध्ये, Airtel युजर्सना Xstream Play चे मोफत सबस्क्रिप्शन देते, ज्यामध्ये वापरकर्त्यांना 23 OTT अॅप्सचा अॅक्सेस मिळतो.