
Airtel Recharge Plan: मोबाईल बिल वाढणार? अचानक गायब झाले दोन लोकप्रिय रिचार्ज प्लॅन, कंपनीच्या निर्णयाने यूजर्स नाराज
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एयरटेलने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्सना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने यूजर्समध्ये लोकप्रिय असलेले दोन प्रीपेड प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 121 रुपये आणि 181 रुपयांचा प्रीपडे प्लॅन्सचा सनावेश आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांसाठी हाय-स्पीड डेटा बेनिफिट्स ऑफर केले जात होते.
तसेच कंपनीच्या या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनमध्ये एयरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियमचा फ्री एक्सेस देखील उपलब्ध होता. ही टेलीकॉम ऑपरेटरची सब्सक्रिप्शन सर्विस आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह सारख्या दुसऱ्या 25 हून अधिक ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा कंटेट उपलब्ध आहे. त्यामुळे आता जर एयरटेल यूजर्सना डेटा बेनिफिट्सचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना दुसऱ्या प्रीपेड प्लन्सची निवड करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एयरटेलने भारतीय सर्कलमध्ये त्यांचे बदलेले प्रीपेड रिचार्ज प्लॅन दाखवण्यासाठी त्यांची वेबसाईट आणि अॅप पेज अपडेट केले आहे. टेलीकॉम ऑपरेटरचे 121 रुपये आणि 181 रुपयांवाले डेटा पॅक आता रिचार्ज ऑप्शनमधून हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता हे प्लॅन यूजर्ससाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता यूजर्सना दुसऱ्या प्लॅनची निवड करावी लागणार आहे. बंद करण्यात आलेल्या प्लॅन्समध्ये यूजर्सना 30 दिवसांसाठी डेटा बेनिफिट्स ऑफर केले जात होते.
एयरटेलच्या सर्वात स्वस्त डेटा प्लॅनची किंमत 100 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते आणि यूजर्सना 6GB डेटा देखील मिळतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना Airtel Xtreme Play सब्सक्रिप्शनचा भाग म्हणून SonyLIV आणि 20 दुसऱ्या ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस देखील दिला जातो. तसेच, ज्या लोकांना जास्त डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी 161 रुपयांचा प्लॅन देखील एक चांगला पर्याय ठरणार आहे. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना 30 दिवसांची व्हॅलिडीटी आणि 12GB डेटा ऑफर केला जातो. याशिवाय कंपनीचा बेस्ट क्रिकेट पॅक 195 रुपयांचा आहे.
टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर (TSP) ने दिलेल्या माहितीनुसार, कस्टमर्सना 12GB डेटा आणि एका महिन्यासाठी JioHotstar Mobile चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये कॉम्प्लिमेंट्री Airtel Xstreme Play सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे. 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या शेवटच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 361 रुपये आहे. यामध्ये यूजर्सना 50GB डेटा ऑफर केला जातो. एअरटेल म्हणते की कोटा पूर्ण झाल्यानंतर, डेटा टॅरिफ प्रति एमबी वापरासाठी 50 पैसे आकारले जाईल.
Ans: डेटा प्लॅन्स – फक्त इंटरनेट वापरासाठी, स्टँडर्ड रिचार्ज / टॉकटाइम प्लॅन्स – कॉलिंगसाठी, कॉम्बो / वॉलेट प्लॅन्स – डेटा + कॉलिंग + SMS.
Ans: होय, अनेक प्लॅन्समध्ये दैनिक किंवा टोटल SMS मिळतो, प्लॅनच्या तपशिलानुसार
Ans: होय, Online / UPI पेमेंट फेल झाल्यास पैसे 2–3 कामकाजाच्या दिवसांत तुमच्या अकाउंटमध्ये परत येतात