फक्त एक फोन नंबर… आणि तुमचा सगळा डेटा उघडा! ही वेबसाईट बनली सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा, जाणून घ्या सविस्तर
सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. कधी कॉल करून सरकारी अधिकारी असल्याची भासवलं जात तर कधी डिजीटल अरेस्ट करून लोकांना ब्लॅकमेल केलं जातं. याशिवाय काही घटनांमध्ये यूजर्सची माहिती लीक केली जाते. दिवसेंदिवस सायबर फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशाच एका घटनेबद्दल आता जाणून घेऊया. खरं तर ही एक वेबसाईट आहे, जिथे सायबर गुन्हेगार केवळ फोन नंबर एंटर करून यूजर्सची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. हा धोका भारतीय यूजर्सना सर्वात जास्त आहे.
एक नवीन वेबसाईट सध्या सायबर गुन्हेगारांसाठी केंद्रबिदू ठरली आहे. या वेबसाईटवर केवळ फोन नंबर एंटर करून हॅकर्स तुमची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेबसाईटवरद्वारे यूजर्सच्या लाईव्ह हालचाली देखील ट्रॅक केल्या जाऊ शकतात. ProxyEarth नावाची ही वेबसाईट राकेश नावाच्या व्यक्तीने बनवली आहे. या वेबसाईटवर आता असा आरोप केला जात आहे की, हे वेबसाईट भारतीय यूजर्सच्या फोन नंबरवरून त्यांची संपूर्ण माहिती लीक करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
तज्ज्ञांनी दावा केला आहे की, ही वेबसाईट भारतातील टेलीकॉम इंफ्रॉस्ट्रक्चरमधील त्रुटींचा फायदा घेऊन लोकांच्या फोन नंबरवरून त्यांची माहिती पुरवते. फोन नंबरच्या आधारे, हॅकर्स जवळच्या मोबाईल टॉवरचे स्थान म्हणजेच टॉवर ट्रँग्युलेशन डेटा वापरून त्यांचे लाईव्ह लोकेशन शोधते. यापूर्वी देखील या वेबसाईटवर लोकांचा वैयक्तिक डेटा आणि लाईव्ह लोकेशन लिक करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुमचे आणि तुमच्या वडिलांचे नाव, पर्यायी क्रमांक आणि ई-मेल आईडीसह लोकेशनची माहिती देखील शेअर केली जाते. अनेक घटनांमध्ये या वेबसाईटने यूजर्सच्या अचूक लाईव्ह लोकेशनची देखील माहिती दिली आहे.
प्रॉक्सी अर्थ वेबसाईट मोबाईल टॉवरकडून मिळणाऱ्या सिग्नलच्या आधारावर यूजरचे लोकेशन आणि टेलीकॉम डेटा रेकॉर्ड करते आणि त्याचे नाव, जन्मतारीख, पर्यायी क्रमांक इत्यादी वैयक्तिक माहिती प्रदान करते. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या टेलिकॉम कंपनीचे सिम कार्ड खरेदी करण्यासाठी कागदपत्रे दिली असतील, तर ही वेबसाईट त्यांच्याकडून माहिती मिळवते. ही वेबसाइट सायबर गुन्हेगारांसाठी एक नवीन शस्त्र म्हणून काम करत आहे, ज्याद्वारे यूजर्सची माहिती लीक केली जात आहे.
वेगवेगळ्या वेबसाईट आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही वेबसाईट तयार करणार राकेश हा एक प्रोगामर आणि व्हिडीओ एडिटर असल्याचा दावा केला जात आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, तो पायरेटेड कंटेंट विकणाऱ्या काही वेबसाईट देखील चालवतो. राकेशचं असं म्हणणं आहे की, तो अशा वेबसाईट तयार करून कोणतंही चुकीचं काम करत नाही. तो अशीच माहिती वापरत आहे, जी आधीपासूनच इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि डेटा लीकमुळे ही माहिती पब्लिक झाली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तो त्याच्या वेबसाइटचा वापर जाहिरातींसाठी आणि ट्रॅफिक आकर्षित करण्यासाठी करत आहे.
Ans: ProxyEarth ही एक थर्ड-पार्टी वेबसाइट असून, ऑनलाइन उपलब्ध सार्वजनिक किंवा स्क्रॅप केलेली माहिती एकत्रित करण्याचा दावा करते असे सांगितले जाते.
Ans: काही अहवालांनुसार या प्लॅटफॉर्मवर फोन नंबर, लोकेशनसारखे सार्वजनिकपणे ऍक्सेस होऊ शकणारे डेटा पॉइंट्स दाखवल्याची चर्चा आहे.
Ans: सायबर तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या अनोळखी, डेटा-संकलन करणाऱ्या वेबसाईट्स सुरक्षित नसू शकतात आणि डेटा प्रायव्हसीला धोका उत्पन्न करू शकतात.






