Airtel तबब्ल 10 वर्षांनंतर बंद करणार विंक म्युझिक ॲप! सर्व कर्मचारी Airtel इकोसिस्टममध्ये होणार सहभागी (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी तबब्ल 10 वर्षांनंतर Airtel त्यांचा म्युझिक ॲप बंद करण्याच्या तयारीत आहे. Airtel लवकरच म्युझिक वर्टिकलमधून बाहेर पडणार आहे आणि Airtel चा विंक म्युझिक ॲप बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्युझिक ॲप बंद झाल्यानंतर विंक म्युझिकच्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश Airtel इकोसिस्टममध्ये केला जाणार आहे. येत्या काही महिन्यातच कंपनीचा हा म्युझिक ॲप बंद केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा- टेलिग्राम बंद झालं तर होईल मोठं नुकसान? युजर्सना मिळणार नाहीत ‘हे’ फीचर्स; WhatsApp पेक्षा टेलिग्रामला दिली जाते अधिक पसंती
कंपनीतील अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, आम्ही येत्या काही महिन्यातच विंक म्युझिक बंद करणार आहोत आणि सर्व विंक म्युझिक कर्मचारी Airtel इकोसिस्टममध्ये सामावून घेतले जाणार आहेत. विंक म्युझिक ॲप बंद झाल्यानंतर Airtel वापरकर्त्यांना ऍपल म्युझिकमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त, विंक प्रीमियम वापरकर्त्यांना Apple साठी Airtel कडून विशेष ऑफर देखील उपलब्ध करून दिलेल्या जाणार आहेत.
आयफोन वापरणाऱ्या ग्राहकांना विशेष ऑफरसह ॲपल म्युझिकमध्ये प्रवेश देण्यासाठी Apple कंपनीने ॲपलसोबत करार केला आहे. या कराराबाबत अद्याप महिती समोर आली नसली तरी हा करार युजर्ससाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. य़ा करारानुसार, विंक म्युझिक ॲप बंद झाल्यानंतर Airtel वापरकर्त्यांना ऍपल म्युझिकमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
हेदेखील वाचा- तुला माझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव! युजरने ChatGPT कडे केली अनोखी मागणी
Airtel कंपनीने म्हटले आहे की, Airtel कंपनी येत्या काही महिन्यातच त्यांचा विंक म्युझिक बंद करणार आहे आणि विंक म्युझिकचे सर्व कर्मचारी Airtel इकोसिस्टममध्ये सामावून घेतले जाणार आहेत. यासह Airtel वापरकर्त्यांना ऍपल म्युझिकमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. याव्यतिरिक्त, विंक प्रीमियम वापरकर्त्यांना Apple साठी Airtel कडून विशेष ऑफर मिळतील. ज्यामुळे युजर्सना म्युझिकचा चांगला अनुभव घेता येईल. या वर्षाच्या अखेरीस भारतातील ग्राहकांसाठी Apple TV+ आणि Apple Music च्या खास ऑफर आणण्यासाठी Apple सोबत करार केला आहे.
2014 मध्ये Airtel ने विंक म्युझिक ॲप लाँच केला होता. कालावधीच ह्या म्युझिक ॲपची लोकप्रियता वाढत गेली. हा म्युझिक ॲप लोकांच्या पसंतीस उतरू लागला. विंक म्युझिक ॲपचे सध्या सुमारे 100 दशलक्ष सदस्य आहेत आणि त्याचा दर महिन्याला 49 रुपये ते 99 रुपयापर्यंत आहे. Airtel चे मुख्य विपणन अधिकारी आणि कार्यकारी उपाध्यक्ष अमित त्रिपाठी यांनी सांगितलं की, Airtel Xstream द्वारे सर्व कंटेट आणि मनोरंजन आणण्यासाठी एक-स्टॉप शॉप ऑफर करते. Apple सोबतची ही भागीदारी आमच्या ग्राहकांना खूप मोलाची संधी देईल कारण त्यांना आता जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट सामग्री आणि मनोरंजन उपलब्ध होणार आहे. नवीन म्युझिक ॲप लाँच करण्याबाबत कंपनीचा सध्या कोणताही प्लॅन नाही.