टेलिग्राम बंद झालं तर होईल मोठं नुकसान? युजर्सना मिळणार नाहीत 'हे' फीचर्स (फोटो सौजन्य - pinterest)
लोकप्रिय सोशल मेसेजिंग ॲप टेलिग्रामवर भारतात बंदी घातली जाईल, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. टेलिग्रामवर विविध आरोप लावले जात आहेत. याच कारण म्हणजे टेलिग्रामचा सीईओ Pavel Durov याला शनिवारी फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. मॉडरेटरच्या कमतरतेमुळे मेसेजिंग ॲपवर गुन्हेगारी कृत्ये विनाअडथळा पुढे जाऊ शकतात. याच प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी Pavel Durov याला फ्रान्समध्ये अटक केली. पावेल दुरोव याला फ्रान्समध्ये ताब्यात घेण्यात आल्याने भारतात चिंता वाढली आहे.
हेदेखील वाचा- प्रचंड चर्चेत असणाऱ्या टेलिग्रामच्या बदनामीची कारणं माहीत आहे का? पेपर लीक, स्टॉक फसवणूक, खंडणी आणि बरंच काही
पावेल दुरोव याला अटक केल्यानंतर भारत सरकारही सतर्क झाले आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडून टेलिग्रामबाबत माहिती मागवली आहे. टेलिग्राम भारतातही कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करत आहे का याची भारत सरकार चौकशी करत आहे. भारतात 50 लाखांहून अधिक लोक टेलिग्राम वापरत आहेत. अशा परिस्थितीत टेलिग्रामवर बंदी घातल्यास अनेक यूजर्सना फटका बसणार आहे. कारण युजर्सची WhatsApp पेक्षा टेलिग्रामला अधिक पसंती आहे.
टेलिग्रामवर मिळणारे फीचर्स युजर्सना WhatsApp वर मिळत नाहीत. या फीचर्समध्ये सीक्रेट चॅट, एकापेक्षा जास्त डीपी, जवळच्या व्यक्तींना कनेक्ट करा, वेगवेगळे ॲप आयकॉन आणि व्हॉइस-टू-टेक्स्ट कनवर्जन यांचा समावेश आहे. हे फीचर्स युजर्सना WhatsApp वर उपलब्ध नाहीत. त्यामुळे युजर्सची WhatsApp पेक्षा टेलिग्रामला अधिक पसंती आहे.
टेलिग्रामवर, युजर्सना खाजगी चॅटिंगसाठी सीक्रेट चॅटची सुविधा उपलब्ध आहे. कंपनी सामान्य चॅटपेक्षा खाजगी चॅट अधिक सुरक्षित करते. तुम्ही सीक्रेट चॅट उघडता तेव्हा, या पेजचा स्क्रीनशॉट देखील कॅप्चर केला जाऊ शकत नाही. त्याच वेळी, व्हॉट्सॲपवर खाजगी चॅट लॉक करण्याची सुविधा आहे, परंतु सीक्रेट चॅटसारखे वैशिष्ट्य तिथे उपलब्ध नाही.
टेलिग्रामवर, युजर्सना एकाच खात्यासह एकापेक्षा जास्त डेस्कटॉप प्रोफाइल सेट करण्याची सुविधा मिळते. टेलिग्राम युजर एकाच वेळी एकापेक्षा जास्त डीपी सेट करू शकतो. व्हॉट्सॲपवर यूजर्सना फक्त एक प्रोफाईल तयार करण्याची सुविधा मिळते. एक यूजर व्हॉट्सॲपवर एकापेक्षा जास्त प्रोफाईल फोटो अपलोड करू शकत नाही.
हेदेखील वाचा- टेलिग्राम सिईओ Pavel Durov ला म्हटलं जातं Russian Zuckerberg! जाणून घ्या त्याच्या रहस्यमय जीवनाविषयी
टेलिग्राम आपल्या युजर्सना त्यांच्या सभोवतालच्या लोकांना जोडण्याची परवानगी देतो. पीपल निअरबाय वैशिष्ट्यासह, टेलीग्राम तुम्हाला लोकेशन ऍक्सेसवर आधारित नवीन लोक जोडण्याची परवानगी देतो. व्हॉट्सॲपवर नवीन लोकांना जोडण्यासाठी, नंबर किंवा QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे.
टेलिग्राम युजर्सना ॲप आयकॉन निवडण्याची सुविधा मिळते. हे फीचर युजर्ससाठी विनामूल्य आणि सशुल्क उपलब्ध आहे. टेलिग्राम युजर्स डिफॉल्ट, व्हिंटेज, एक्वा, प्रीमियम, टर्बो, नॉक्स सारखे आयकॉन निवडू शकतात. व्हॉट्सॲपवर यूजर्सना फक्त एका आयकॉनची सुविधा मिळते.
युजर्सना टेलिग्रामवर प्रीमियम सबस्क्रिप्शनची सुविधा देखील मिळते. सशुल्क युजर्सना व्हॉइस-टू-टेक्स्ट रूपांतरण वैशिष्ट्यात प्रवेश मिळतो. म्हणजेच यूजर कोणताही व्हॉइस मेसेज वाचू शकतो. असे फीचर व्हॉट्सॲपवर आणण्याची तयारी सुरू आहे.