India vs Pakistan Final: Airtel, Jio आणि Vodafone यूजर्स फ्रीमध्ये कसा पाहू शकता भारत vs पाकिस्तान सामना? जाणून घ्या
भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये आज Asia Cup चा अंतिम सामना होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. तुम्ही देखील या सामन्यासाठी उत्सुक असाल आणि तुम्हाला देखील हा सामना लाईव्ह पाहण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Vodafone Idea (Vi), एयरटेल आणि जियोने त्यांच्या युजर्सना इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना लाईव्ह पाहता यावा यासाठी काही खास सोय केली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर आज रात्री इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना लाईव्ह पाहू शकता पण यासाठी तुम्हाला Sony LIV चे सबस्क्रीप्शन गरजेचे आहे. पण आता आम्ही तुम्हाला अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म Sony LIV चे सबस्क्रीप्शन मोफत मिळते. त्यामुळे तुम्हाला वेगळे सबस्क्रीप्शन खरेदी करण्याची गरज भासत नाही आणि तुमचे जास्तीचे पैसे देखील खर्च होत नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Sony LIV ॲप तसेच तुम्ही Sony LIV च्या वेबसाईटवर देखील या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहात. यासोबतच तुम्ही हा T20I सामना टीव्हीवर Sony Sports Network चे चॅनेल Sony Sports 1, Sony Sports 3 (Hindi), Sony Sports 4 (Telugu), Sony Sports 4 (Tamil), आणि Sony Sports 5 वर लाईव्ह पाहू शकणार आहात.
Sony LIV ॲप यूजर त्यांच्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करू शकतात. पण या ॲपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी तुमच्याकडे सबस्क्रीप्शन असणे अत्यंत आवश्यक आहे. Sony LIV च्या सबस्क्रीप्शनबद्दल बोलायचे झाले तर या ॲपचे सबस्क्रीप्शन जग महिना 399 रुपये आहे.
Airtel, Jio आणि Vi त्यांचे युजर्स काही असे रिचार्ज प्लॅन ऑफर करतात, ज्यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी Sony LIV चे सबस्क्रीप्शन फ्री मध्ये दिले जाते. आता आम्ही तुम्हाला तिन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म Sony LIV ॲपचे सबस्क्रीप्शन फ्री मिळणार आहे.
जियो फाइबर: जियोच्या ब्रॉडबेंड सर्विस यूजर्सना कंपनी 599 रुपये आणि 899 रुपये वाले प्लॅन ऑफर करते या प्लॅनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म Sony LIV ॲप चे सबस्क्रीप्शन मोफत मिळते. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटासह अनुक्रमे 30Mbps आणि 100 Mbps स्पीड मिळते.
वोडाफोन-आइडिया: Vi चे प्रीपेड यूजर्स 95 रुपये, 408 रुपये आणि 999 रुपयांच्या प्लॅनसह ओटीटी प्लॅटफॉर्म Sony LIV ॲपचे मोबाइल सब्सक्रिप्शन मोफत मिळवू शकतात. यासोबतच Vi Max 5G पोस्टपेड यूजर्स 751 रुपयांच्या प्रति महिना रिचार्ज प्लॅनसह Sony Liv चे सब्सक्रिप्शन मिळवू शकतात.
एयरटेल: एयरटेल देखील त्यांच्या युजर्सना Airtel Xstream सह SonyLiv चे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर करतो. एअरटेलच्या काही प्लॅनमध्ये Xstream फ्री मिळते. एक्सट्रीम सर्विसच्या सब्सक्रिप्शनची किंमत 279 रुपये आहे, ज्याची व्हॅलिडीटी तीन महिन्यांची आहे.