Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
Amazon Great Indian Festival सेल सुरु झाला असून सर्वत्र या सेलची चर्चा आहे. सेलमध्ये स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री स्मार्टफोन होत आहे. कारण या सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल हा सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कंपनीने सुरु केलेल्या Amazon Great Indian Festival मध्ये Oppo F27 Pro+ 5G स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
Amazon Great Indian Festival मध्ये Oppo F27 Pro+ 5G स्मार्टफोनवर 10 हजारांहून अधिक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे सेलमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. डिस्काऊनंतर या स्मार्टफोनची किंमत 18 हजारांहून कमी झाली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आता एक बजेट फ्रेंडली ऑप्शन बनला आहे. खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन 27,999 रुपयांना लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. जर तुम्ही असा फोन शोधत असाल जो सर्वकाही देतो आणि जास्त किंमत नसतो, तर Oppo F27 Pro+ 5G मिळवण्याची ही एक उत्तम संधी असू शकते. चला या डीलवर बारकाईने नजर टाकूया.
Oppo F27 Pro+ 5G चे बेस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंट सेलमध्ये 18,699 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्लॅट 9,300 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. याशिवाय SBI क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शनलर 1,250 रुपयांचे बँक डिस्काउंट देखील ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे आता स्मार्टफोनची किंमत 17,499 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 907 रुपयांपासून सुरू होणारा नो-कॉस्ट ईएमआय देखील देत आहे. याव्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या फोनवर 16,400 रुपयांपर्यंत सूट देखील मिळू शकते.
Oppo F27 5G मध्ये 6.7-इंचाची 3D कर्व्ड AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, अल्ट्रा-नॅरो बेजल्स आणि 93% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो मिळतो. या फोनमध्ये 64MP मेन कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
फोन MediaTek 7050 प्रोसेसरवर आधारित आहे, ज्यामध्ये ARM Cortex-A78 आणि Cortex-A55 कोर आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. हे ColorOS 14 वर आधारित आहे. यामध्ये 5,000mAh बॅटरी देण्याच आली आहे, जी 67W SUPERVOOC फ्लॅश चार्ज सपोर्ट आहे. कंपनीने दावा केला आहे की, ते फक्त 44 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज होते आणि 20 मिनिटांत सुमारे 56% पर्यंत चार्ज होते.