Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोल्डेबल iPhone ची प्रतिक्षा वाढली! Apple ने पुन्हा बदलली रणनिती, या महिन्यात विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता

आगामी फोल्डेबल आयफोनबाबत काही रिपोर्ट समोर आले आहेत. या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर कंपनीचा फोल्ड आयफोन सप्टेंबर महिन्यात लाँच होणार असल्याची माहिती आहे. मात्र त्याची विक्री सुरु होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 23, 2026 | 10:32 AM
फोल्डेबल iPhone ची प्रतिक्षा वाढली! Apple ने पुन्हा बदलली रणनिती, या महिन्यात विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता

फोल्डेबल iPhone ची प्रतिक्षा वाढली! Apple ने पुन्हा बदलली रणनिती, या महिन्यात विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • नवीन डिझाईन, नवी उत्सुकता, Apple ची मोठी तयारी
  • फोल्ड होणारा iPhone आता चर्चेचा केंद्रबिंदू
  • Apple पुन्हा तयार करतंय स्मार्टफोन बाजारात मोठा बदल
टेकजायंट कंपनी अ‍ॅपल यावर्षी त्यांची आयफोन 18 सिरीज लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने तयारी देखील सुरु केली आहे. आयफोन 18 सिरीजसोबतच कंपनी यावर्षी त्यांचा पहिला फोल्ड आयफोन देखील लाँच करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आयफोन फोल्डबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी त्यांचा फोल्डेबल आयफोन देखील आयफोन 18 सिरीजसोबतच लाँच करणार आहे. मात्र या फोल्डेबल आयफोनची विक्री सुरु होण्यासाठी काही काळ लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांना हा आयफोन खरेदी करण्यासाठी वाट पाहावी लागू शकते.

Oppo A6s 5G vs Vivo T5x: 20 हजार रुपयांत कोण ऑफर करणार दमदार फीचर्स? बॅटरीपासून किंमतीपर्यंत… वाचा संपूर्ण तुलना

पुरवठा साखळीमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे फोल्डेबल आयफोनच्या विक्रीसाठी बराच काळ लागू शकतो. यामुळे लाँचिंगनंतर देखील यूजर्सना हा आयफोन मॉडेल खरेदी करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सहसा अ‍ॅपल त्यांचे आयफोन मॉडेल्स सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाँच करते. त्यानंतर या आयफोन मॉडेल्सची विक्री सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होते. मात्र कंपनी फोल्डेबल आयफोनच्या बाबतीत त्यांची ही रणनिती बदलण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी आयफोन 18 सिरीज आणि फोल्डेबल आयफोन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच करू शकते. मात्र आयफोन 18 सिरीज आणि फोल्ड आयफोनची विक्री एकाच वेळी सुरु होणार नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest)

फोल्डेबल आयफोनची विक्री डिसेंबर महिन्यात सुरु होण्याची शक्यता वर्तवली आहे. लाँचनंतर तीन महिन्यांनी ग्राहक हे डिव्हाईस खरेदी करू शकणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे की, सप्टेंबर महिन्यात अ‍ॅपल ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी आयफोन 18 सिरीज आणि फोल्ड आयफोन लाँच करण्याची शक्यता आहे.

कंपनीने अलीकडेच 20 मिलियन फोल्डेबल डिस्प्ले पॅनलची ऑर्डर दिली आहे. अ‍ॅपलसाठी हा फोल्डेबल डिस्प्ले पॅनल दक्षिण कोरियाई कंपनी सॅमसंग बनवणार आहे. आधीच 13 ते 15 मिलियन फोल्डेबल डिस्प्लेची ऑर्डर दिली होती. मात्र मागणी वाढण्याची शक्यता असल्याने कंपनीने डिस्प्ले पॅनलची ऑर्डर वाढवली आहे. सॅमसंगने ॲपलच्या फोल्डेबल आयफोनसाठी डिस्प्ले पॅनेलची एक विशेष उत्पादन लाइन उभारली असून, येत्या काही आठवड्यांत उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर फोनची असेंबली सुरुवात होणार आहे.

इंटरनेट नसेल तरी पेमेंट थांबणार नाही! UPI चे ऑफलाइन पेमेंट फीचर करणार तुमची मदत, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

मे महिन्यात सुरु होणार डिस्प्लेचे प्रोडक्शन

यावर्षी सप्टेंबर महिन्यात Apple Air 2, फोल्ड आयफोन, आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स हे मॉडेल्स लाँच केले जाणार आहेत. तर 2027 मध्ये अ‍ॅपल कंपनी आयफोन 18 आणि आयफोन 18 ई लाँच करण्याची शक्यता आहे. सॅमसंग मे महिन्यात फोल्डेबल आयफोनच्या डिस्प्लेचे प्रोडक्शन सुरु करणार आहे. अ‍ॅपलने फोल्डेबल पॅनेलसाठी बीओईशी संपर्क साधला होता, परंतु पुरवठा साखळी आणि उत्पादन दरातील समस्यांमुळे ती चिनी कंपनी ही ऑर्डर पूर्ण करू शकली नाही. आता, ऍपलच्या फोल्डेबल आयफोनसाठी फक्त सॅमसंगच पॅनेलचे उत्पादन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Apple foldable iphone will face another twist device sale will starts in this month tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
2

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.