Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव

Truecaller: 1 नोव्हेंबर 2026 पासून अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास मोबाईल स्क्रीनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसणार असल्याची माहिती या बातमीत देण्यात आली आहे. हे नाव सिमकार्ड खरेदी करताना दिलेल्या सरकारी ओळखपत्रावरील माहितीनुसार दाखवले जाणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 09, 2026 | 04:13 PM
New Caller ID Rule: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

New Caller ID Rule: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अनोळखी कॉलवर दिसणार खरं नाव.
  • Truecaller शिवाय ओळखता येणार कॉलर.
  • बनावट कॉल्सना बसणार आळा.

1 नोव्हेंबर 2026 पासून, जेव्हाही तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल येईल, तेव्हा नंबरसोबत त्या व्यक्तीचे खरे नाव स्क्रीनवर दिसेल. हे नाव, सिम खरेदी करताना सरकारी ओळखपत्रात (जसे की आधार) दिलेल्या नावासारखेच असेल. दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना हा नियम लागू करणे अनिवार्य केले आहे. तुम्हाला कोणतेही अॅप डाउनलोड करण्याची किंवा सेवा सुरू करण्याची गरज नाही; ती आपोआप काम करेल. आतापर्यंत, अनोळखी नंबर ओळखण्यासाठी लोक Truecaller सारखे अॅप्स वापरत होते, पण आता तुम्हाला कोणत्याही अॅपशिवाय कळेल की कोण कॉल करत आहे. यामुळे बनावट आणि फसवणुकीचे कॉल टाळणे सोपे होईल. Truecaller

आतापर्यंत काय होतं?

अनोळखी नंबरवरून फोन आला की आपण घाबरायचो. उचलू की नको, हाच प्रश्न पडायचा. बँकेचा आहे की फ्रॉडचा आहे, कळायचंच नाही. मग Truecaller वर नाव बघायचो. पण Truecaller मध्ये पण कोणीही काहीही नाव टाकू शकतं. त्यामुळे खरं नाव कळतच नव्हतं. आता सरकारने यावरच उपाय काढलाय.

नवा नियम काय आहे

आता तुम्हाला कॉल आला की तुमच्या स्क्रीनवर फक्त नंबर नाही, तर त्या माणसाचं खरं नाव पण दिसणार. हे नाव कुठून येणार? तुम्ही सिम घेताना आधार कार्ड दिलं होतं ना, त्यात जे नाव आहे तेच नाव दिसणार. म्हणजे कोणीही खोटं नाव वापरून कॉल करू शकणार नाही.

हे काम करण्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. कोणतंही अॅप डाऊनलोड करायचं नाही, कोणतीही सेटिंग बदलायची नाही. 1 नोव्हेंबरपासून हे आपोआप सुरू होणार आहे. Jio असो, Airtel असो, Vi असो किंवा BSNL असो, सगळ्या कंपन्यांना हा नियम पाळावाच लागणार आहे.प्रश्न आणि उत्तरांमध्ये समजून घ्या

प्रश्न 1: फोन आल्यावर स्क्रीनवर नक्की काय दिसणार?

उत्तर: जर नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह असेल, तर तुम्ही सेव्ह केलेलं नावच दिसणार. म्हणजे आई, बाबा, मित्र असं तुम्ही सेव्ह केलंय तेच. पण जर नंबर सेव्ह नसेल, तर सिम घेताना दिलेलं खरं नाव दिसणार. म्हणजे आता “Unknown Number” म्हणून काहीच येणार नाही.

प्रश्न 2: परदेशातून कॉल आला तर काय होणार?

उत्तर: जर कॉल दुसऱ्या देशातून येत असेल, तर स्क्रीनवर नाव दिसणार नाही. फक्त “International Call” असं लिहिलेलं दिसेल. कारण दुसऱ्या देशाचा डेटा आपल्याकडे नाही.

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

प्रश्न 3: हे सगळं काम कसं करणार?

उत्तर: प्रत्येक कंपनीला आपल्या ग्राहकांची नावं आणि नंबर यांचा एक वेगळा डेटाबेस बनवावा लागणार आहे. तुम्हाला कॉल आला की कंपनी लगेच त्या डेटाबेसमधून नाव शोधून तुमच्या स्क्रीनवर पाठवणार. हे सगळं 2-3 सेकंदात होणार.

प्रश्न 4: माझं नाव सगळ्यांना दिसणार का? माझी प्रायव्हसी काय?

उत्तर: हीच सगळ्यात मोठी भीती लोकांना वाटते. पण सरकारने सांगितलंय, कॉल संपला की लगेच ते नाव सिस्टिममधून काढून टाकलं जाणार. ते कुठेही सेव्ह होणार नाही. आणि ज्यांना आपलं नाव दाखवायचं नाहीये, त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. त्याला CLIR म्हणतात. तो पर्याय निवडला तर तुमचं नाव दिसणार नाही.

प्रश्न 5: दुकानदार, कंपनी यांचं काय?

उत्तर: ज्यांचं दुकान आहे, कंपनी आहे, त्यांना आपल्या दुकानाचं नाव दाखवायचं असेल तर ते दाखवू शकतात. पण त्यासाठी त्यांना आपलं GST किंवा ट्रेडमार्कचं कागदपत्र कंपनीला द्यावं लागणार. कागदपत्र बरोबर असेल तरच दुकानाचं नाव दिसेल. नाहीतर मालकाचं खरं नावच दिसेल.

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा

तुम्ही काय करायला पाहिजे?

पहिली गोष्ट, तुमचं सिम कोणाच्या नावावर आहे ते चेक करा. बऱ्याच घरात सिम वडिलांच्या किंवा भावाच्या नावावर असतं, वापरतो आपण. असं असेल तर 1 नोव्हेंबरपासून तुम्ही कोणाला फोन केला की तुमचं नाही, तर त्या माणसाचं नाव दिसेल. त्यामुळे वेळ असेल तर जाऊन KYC अपडेट करून घ्या. आपलं नाव, आपला आधार, आपला फोटो बरोबर आहे का ते बघा.

दुसरी गोष्ट, जर तुमचा व्यवसाय असेल तर 1 नोव्हेंबरच्या आधीच आपले GST कागदपत्रं कंपनीला देऊन ठेवा. म्हणजे लोकांना तुमच्या दुकानाचं नाव दिसेल, तुमचं वैयक्तिक नाव नाही.फ्रॉड करणाऱ्यांसाठी हा नियम म्हणजे मोठा धक्का आहे. आता ते बँकेचं नाव सांगून लोकांना फसवू शकणार नाहीत. कारण त्यांचं खरं नाव स्क्रीनवर दिसणारच. त्यामुळे आता अनोळखी नंबर आला तरी घाबरायचं कारण नाही. नाव बघा, ओळखीचं वाटलं तरच फोन उचला.

Truecaller ची गरज आता हळूहळू संपणार आहे. कारण जे काम Truecaller करायचं, तेच काम आता सरकारच करणार आहे, आणि ते पण खऱ्या नावासोबत.

Web Title: New caller id rule november 1 2026 unknown calls without truecaller rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • maharshtra
  • Marathi News
  • Tech News
  • Truecaller

संबंधित बातम्या

Nagpur News : शेतकऱ्यांच्या अनुदानावर बँकांचा डोळा नको; मदतीची रक्कम कर्ज खात्यात वळती केल्यास कारवाईचा इशारा
1

Nagpur News : शेतकऱ्यांच्या अनुदानावर बँकांचा डोळा नको; मदतीची रक्कम कर्ज खात्यात वळती केल्यास कारवाईचा इशारा

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा
2

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा

PF खात्यात किती पैसे जमा आहेत? घरबसल्या मोबाईलवर मिळवा एका क्लिकमध्ये माहिती
3

PF खात्यात किती पैसे जमा आहेत? घरबसल्या मोबाईलवर मिळवा एका क्लिकमध्ये माहिती

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक
4

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.