
Smartphone Buying Guide (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आजकाल नवीन फोन घ्यायला गेलो की दुकानदार पहिलं काय दाखवतो? “सर, यात 12 GB रॅम आहे, 108 MP कॅमेरा आहे.” बस. आपण पण त्याच्यावर खुश होऊन फोन घेऊन येतो. पण खरं सांगायचं तर फोनची ताकद रॅम किंवा कॅमेऱ्यात नसते. फोन आतून कसा आहे, त्याचं इंजिन कसं आहे, यावर सगळं अवलंबून असतं.दिवाळीत लोक ऑफर बघून फोन घेतात. नंतर दोन-तीन महिन्यांनी फोन हँग व्हायला लागतो, बॅटरी पटकन संपते, अपडेटच येत नाही. मग वाटतं, पैसे फुकट गेले. असं होऊ नये म्हणून फोन घेताना या 10 गोष्टी दुकानातच उघडून बघा. Smartphone Buying Guide:
फोनचा खरा मेंदू म्हणजे प्रोसेसर. तुम्हाला गेम खेळायचे असतील, एकाच वेळी 4-5 अॅप चालवायचे असतील तर Snapdragon 8 Series किंवा Dimensity चा नवीन प्रोसेसर बघा. प्रोसेसर किती nm चा आहे हे पण बघा. 4nm किंवा 3nm वाला असेल तर फोन फास्ट चालतो आणि बॅटरी पण कमी खातो.
8 GB आहे म्हणून लगेच खुश होऊ नका. तो रॅम LPDDR5X आहे का LPDDR5 आहे हे विचारा. आणि आतली मेमरी UFS 4.0 किंवा 3.1 आहे का हे पण बघा. जर UFS 2.2 असेल तर फोटो, व्हिडिओ कॉपी करताना फोन कासवासारखा चालेल.
Jio, Airtel वेगवेगळ्या बँडवर 5G देतात. फोनमध्ये फक्त 2-3 बँड असतील तर गावात किंवा दुसऱ्या शहरात गेल्यावर नेटवर्क गायब होईल. त्यामुळे कमीत कमी 8 ते 12 बँड असलेला फोन घ्या.
बऱ्याच कंपन्या स्वस्त फोन विकतात, पण नंतर अपडेट देतच नाहीत. फोन घेताना विचारा, “याला किती वर्ष Android अपडेट मिळणार? सिक्युरिटी अपडेट किती वर्ष?” कमीत कमी 3-4 वर्षाचं मोठं अपडेट आणि 5 वर्षाचं सिक्युरिटी अपडेट मिळालंच पाहिजे. नाहीतर एका वर्षात फोन जुना वाटायला लागतो.
रिल्स बघताना स्क्रीन अडकायला नको असेल तर 120Hz वाली AMOLED स्क्रीन घ्या. आणि उन्हात उभं राहून फोन बघायचा असेल तर ब्राइटनेस 1500 ते 2000 Nits तरी असलाच पाहिजे. कमी ब्राइटनेस असेल तर उन्हात स्क्रीन दिसणारच नाही.
108 MP म्हणजे भारी फोटो, असं अजिबात नाही. फोटो चांगला येण्यासाठी OIS पाहिजे. OIS म्हणजे हात हलला तरी फोटो हलत नाही. आणि सेन्सर कोणाचा आहे? Sony चा आहे का Samsung चा, हे नक्की बघा. चांगला सेन्सर असेल तर 50 MP पण भारी फोटो काढतो.
PF खात्यात किती पैसे जमा आहेत? घरबसल्या मोबाईलवर मिळवा एका क्लिकमध्ये माहिती
आजकाल 5000mAh पेक्षा कमी बॅटरीचा फोन घेऊच नका. दिवसभर फोन चालला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बॉक्समध्ये चार्जर आहे का? चार्जर 45W, 68W चा आहे का? काही कंपन्या आता चार्जरच देत नाहीत, मग वरून 1500 रुपये खर्च होतो.
हातातून फोन पाण्यात पडला किंवा पावसात भिजला तर? त्यासाठी फोनला IP67 किंवा IP68 रेटिंग असलं पाहिजे. याचा अर्थ फोनला धूळ आणि पाणी लागलं तरी लगेच खराब होत नाही.
दिवाळीत सगळ्यात मोठा घोटाळा असतो किंमतीचा. आधी किंमत 30 हजार दाखवतात, मग 22 हजाराला देतो म्हणतात. खरं तर त्या फोनची किंमत 22 हजारच असते. त्यामुळे 2-3 ठिकाणी किंमत चेक करा. Flipkart, Amazon आणि दुकानातली किंमत तुलना करा. बँकेचं कॅशबॅक आहे का ते पण बघा.
Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक
फोन कितीही भारी असला तरी एक दिवस बिघडणारच. तेव्हा सर्व्हिस सेंटर लांब असेल तर पंचाईत होते. तुमच्या शहरात त्या कंपनीचं सर्व्हिस सेंटर आहे का, हे आधी बघा. आणि बिल घेताना वॉरंटी कार्डवर शिक्का आहे का, ते पण तपासा.शेवटी एकच सांगतो, दुकानदाराचं ऐकून फोन घेऊ नका. फोन हातात घ्या, सेटिंग उघडा, वरील 10 गोष्टी स्वतः तपासा. फोन 20 हजाराचा असो किंवा 50 हजाराचा, या गोष्टी जर बरोबर असतील तरच तुमचा फोन पुढची 3-4 वर्षं तुम्हाला त्रास देणार नाही.
Ans: स्मार्टफोनचा प्रोसेसर, रॅमचा प्रकार आणि इंटरनल स्टोरेज तपासावे
Ans: केवळ रॅमची क्षमता न पाहता LPDDR5 किंवा LPDDR5X सारखा रॅमचा प्रकारही तपासावा.
Ans: बातमीत दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी 8 ते 12 5G बँड असलेला फोन निवडावा.