Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple iPhone 16 ची क्रेझ, खरेदीसाठी सलग 21 तास रांगेत उभा राहिला, या व्यक्तिने खरेदी केला मुंबईतील पहिला आयफोन 16

Apple iPhone 16 भारतात लाँच झाला आहे. आयफोन लाँच होताच तो खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. iPhone 16 सिरीज iPhone 16 (बेस मॉडेल), iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. iPhone 16 Pro चा कॅमेरा देखील उत्तम आहे, ज्यात 48MP फ्यूजन कॅमेरा आहे. यात सेकंड जनरेशन क्वाड-पिक्सेल सेन्सर आणि झिरो शटर लॅग आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 21, 2024 | 11:30 PM
Apple iPhone 16 ची क्रेझ, खरेदीसाठी सलग 21 तास रांगेत उभा राहिला, या व्यक्तिने खरेदी केला मुंबईतील पहिला आयफोन 16

Apple iPhone 16 ची क्रेझ, खरेदीसाठी सलग 21 तास रांगेत उभा राहिला, या व्यक्तिने खरेदी केला मुंबईतील पहिला आयफोन 16

Follow Us
Close
Follow Us:

भारतात आयफोनची क्रेझ किती वाढली आहे हे काही वेगळं सांगायला नको. भारतातच नाही तर परदेशातसुध्दा लोकांना आयफोनचे क्रेझ आहे. आयफोन लाँच होताच तो खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आयफोनच्या खरेदीसाठी लोकं 20 ते 23 तास रांगेत उभं राहून वाट पाहत असतात. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ देखील व्हायरल होत ज्यामध्ये तुम्ही आयफोन खरेदीसाठीची लोकांची क्रेझ पाहू शकता.

हेदेखील वाचा- टेक क्षत्रातील दिग्गज आहे भारतीय तरूणाचा फॅन! iPhone च्या आइडियामुळे बदललं आयुष्य

Apple iPhone 16 भारतात लाँच झाला आहे. लोक त्यांच्या स्वप्नातील फोन घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. ॲपल आयफोनचा असाच एक चाहता आहे गुजरातचा उज्ज्वल शाह. आपला आवडता iPhone-16 घेण्यासाठी तो 21 तास रांगेत उभा राहिला. Apple iPhone 16 खरेदी करण्यासाठी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील Apple Store ला भेट देणारे ते पहिले व्यक्ती ठरले.

ॲपलचा नवीन आयफोन घेण्यासाठी उज्ज्वल शाह यांनी अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास केला. त्यांनी सांगितले की, मी खूप उत्साहित आहे. मी 21 तासांपासून इथे उभा आहे. Apple स्टोअरमध्ये जाणाऱ्या रांगेत मी पहिला आहे. iPhone 16 मध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. iPhone 16 खरेदी करण्यासाठी मी प्रचंड उत्साहित आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)

नोएडा येथील व्यावसायिक सिंगर सहज अंबावत हा दिल्ली-एनसीआरमध्ये iPhone 16 सिरीज खरेदी करणारा पहिला व्यक्ती ठरला आहे. त्याने Desert Titanium variant मध्ये 256GB स्टोरेजसह iPhone 16 Pro खरेदी केला, ज्याची किंमत 1.3 लाख रुपये होती, परंतु कॅशबॅक ऑफरमुळे तो 1.25 लाख रुपयांमध्ये डिव्हाइस मिळवू शकला. संगीतकार या नात्याने सहजने नवीन फोनबद्दल उत्सुकता व्यक्त केली, विशेषत: ऑडिओ मिक्स वैशिष्ट्याबाबत त्याने सांगितलं. त्याच्या गाण्याच्या व्हिडीओजचा दर्जा वाढवण्यासाठी ह्या फोनचे फीचर्स उपयुक्त ठरतील असा विश्वास त्याने व्यक्त केला. तो म्हणाला की, ऑडिओ मिक्स वैशिष्ट्य माझ्यासाठी खरोखर उपयुक्त आहे, विशेषत: रेकॉर्डिंग करताना.हे वैशिष्ट्य माझ्या संगीताची गुणवत्ता सुधारेल.

हेदेखील वाचा- भारतात लाँच होण्यापूर्वीच iPhone 16 चे फिचर्स आणि किंमत आली समोर! वाचा किती स्वस्त असेल नवीन iPhone?

आयफोन 16 ची किंमत जाणून घ्या

  • iPhone 16 सिरीज iPhone 16 (बेस मॉडेल), iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे.
  • iPhone 16 Pro अनेक उत्कृष्ट रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात गडद काळा टायटॅनियम, ब्राइट व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि न्यू डेझर्ट टायटॅनियम यांचा समावेश आहे.
  • iPhone 16 मधील बॅटरी बॅकअप इतर iPhones पेक्षा चांगला आहे.
  • भारतात iPhone 16 ची किंमत 79,900 रुपये आहे.
  • iPhone 16 Plus ची किंमत 89,900 रुपये आहे.
  • iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे आणि iPhone 16 Pro Max ची किंमत 1,44,900 रुपये आहे.

iPhone 16 चे फीचर्स

iPhone 16 Pro चा कॅमेरा देखील उत्तम आहे, ज्यात 48MP फ्यूजन कॅमेरा आहे. यात सेकंड जनरेशन क्वाड-पिक्सेल सेन्सर आणि झिरो शटर लॅग आहे. नवीन 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 120mm फोकल लेंथसह 5x टेलीफोटो लेन्स फोटोग्राफिक क्षमता वाढवतात. कॅमेरा कंट्रोल करताना, अचूक शॉट कॅप्चर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यासह प्रत्येक फोटो छान दिसेल.

Web Title: Apple iphone 16 craze queued for 21 hours this man bought the first iphone 16 in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 11:30 PM

Topics:  

  • iPhone 16
  • technology

संबंधित बातम्या

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात  मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य
1

मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार
2

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job
3

AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण, वेळीच बदला Job

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा
4

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.