टेक क्षत्रातील दिग्गज आहे भारतीय तरूणाचा फॅन! iPhone च्या आइडियामुळे बदललं आयुष्य (फोटो सौजन्य - pinterest)
Marques Brownlee किंवा MKBHD ला टेक क्षेत्रातील दिग्गजांपपैकी एक म्हटलं जातं. वयाच्या अवघ्या 30 वर्षांतच Marques Brownlee ने टेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. Marques Brownlee ची पर्सनॅलिटी आणि त्याचं संभाषण प्रत्येकालाच आकर्षित करतं. Marques Brownlee ने Apple चे सीईओ टिम कुक सारख्या मोठ्या दिग्गजांसोबत देखील संवाद साधला आहे. पण एवढ्या मोठ्या व्यक्तिसोबत संवाद साधल्यानंतर देखील Marques Brownlee कोणाचा फॅन आहे माहीत आहे का? Marques Brownlee एका भारतीय तरूणाचा फॅन आहे.
हेदेखील वाचा- भारतात सुरू झाली Instagram Creator Lab! क्रिएटर्सना मिळणार फेमस होण्यासाठी खास मंत्र
सध्याच्या सोशल मिडीयाच्या जगातील सर्वात ट्रेंडिंग शब्द म्हणजे giveaway. giveaway म्हणजे युट्युबर्स किंवा अनेक कंपन्या त्यांच्या युजर्सना एखादी भेटवस्तू देतात. giveaway हे तंत्रज्ञान जगातील लोकांचे सर्वात आवडते साधन आहे. कारण ह्या माध्यमातून आपल्याला अनेक भन्नाट गॅजेट्स जिंकण्याची संधी मिळते. पण ह्यामध्ये काही अटींचा समावेश केला जातो. जसं की, तुमच्या कमेंट्सला सर्वाधिक लाईक्स मिळाले तर तुम्ही भेटवस्तू जिंकू शकता. यामुळे कंपनीच्या युजर्समध्ये वाढ होते. असंच एक giveaway टेक दिग्गज Marques Brownlee ने 2018 साली केला होता.
2018 मध्ये, Marques Brownlee ने त्याच्या X हँडलवर iPhone XR चा giveaway करण्याचे जाहीर केले होतं. यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये युजर्सना लाईक-शेअर-सबस्क्राईब आणि कमेंट करायची होती. ज्याची कमेंट बेस्ट असेल त्याला iPhone XR दिला जाणार होता. या पोस्टवर Singh in USA नावाच्या एका युजवरने कमेंट केली होती. त्याने म्हटलं होतं की, माझ्या आयुष्यात माझ्याकडे कधीही आयफोन नव्हता. होय, काही काळ iPod Touch वापरला आहे. त्यामुळे मला iPhone XR RED आवृत्तीमध्ये अपग्रेड करायला आवडेल. Marques Brownlee या युजरची कमेंट प्रचंड आवडली. त्याने या युजरला iPhone XR RED दिला.
हेदेखील वाचा- TRAI ने करोडो मोबाईल वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा, आता ‘या’ दिवसापासून लागू होणार नवीन नियम
आज या गोष्टीला 6 वर्षे पूर्ण झाली. मग आम्ही 6 वर्षांनतर तुम्हाला हे सगळं का सांगतोय असा प्रश्न पडला आहे का? iPhone XR RED मुळे त्या युजरचं संपूर्ण आयुष्य बदललं. त्याने स्वत:चा युट्यूब चॅनेल सुरु केला आहे. त्याचे युट्यूब चॅनेलवर 1 मिलीयन फॉलोवर्स आहेत. याबाबत Marques Brownlee ने पोस्ट केली आहे. एक कमेंट आणि त्या युजरचं संपूर्ण आयुष्य बदललं. त्यामुळे Marques Brownlee या भारतीय युजरचा फॅन झाला आहे.
Fun fact: I did a giveaway of an iPhone XR on Twitter back in 2018
The winner of that phone went and started a YouTube channel, and has since built it up to over 1 million subscribers 🤯
Give him a follow! https://t.co/bfhr9JSU7C https://t.co/cETpDdbEA6
— Marques Brownlee (@MKBHD) August 30, 2024
Singh in USA हा सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. तो स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील चालवतो. Singh अमृतसरहून अमेरिकेला गेला आहे. मार्क्सकडून आयफोन मिळाल्यानंतर Singh यांनी त्यांचा YouTube प्रवास गांभीर्याने घेतला आणि आज त्यांचे 1 मलियनहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत. चॅनेलवर सुमारे 1000 व्हिडिओ आहेत. तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्यास, व्हिडिओवरील दृश्ये देखील चांगली आहेत.