Upcoming Apple Products: टेक जायंट कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज! एक - दोन नाही या महिन्यात लाँच करणार पाच ढासू प्रोडक्ट्स
सप्टेंबरमध्ये टेक जायंट कंपनी Apple ने आयफोन 17 सीरीजसह अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. या प्रोडक्ट्सनंतर आता कंपनी पुन्हा एकदा नवीन प्रोड्क्टस लाँच करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, कंपनी ऑक्टोबर महिन्यात 5 नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. आगामी प्रोडक्ट्स Apple इकोसिस्टमच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये लाँच केले जाणार आहेत. या आगामी प्रोड्क्समध्ये आयपॅडपासून नवीन Apple टिव्हीपर्यंत अनेक प्रोड्क्टसचा समावेश असणार आहे. कंपनी या महिन्यात कोणते नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
गेल्यावर्षी कंपनीने या प्रोडक्टच्या डिस्प्लेमध्ये मोठा बदल केला होता आणि यावर्षी या प्रोडक्टमध्ये नवीन प्रोसेसर दिला जाणार आहे. या आयपॅडमध्ये नवीन M5 प्रोसेसर, 16 जीबी रॅमसह लाँच केला जाणार आहे. कंपनी फ्रंटला ड्युअल कॅमेरे देऊ शकते. जर अॅपलमध्ये C1X मॉडेमचा समावेश असेल, तर तो आतापर्यंतचा सर्वात वेगवान कनेक्टेड आयपॅड असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple तब्बल चार वर्षांनंतर हे ब्लूटूथ ट्रॅकर अपडेट करणार आहे. नवीन एयरटॅगमध्ये अधिक चांगले प्रायव्हसी कंट्रोलसह नवीन अल्ट्रा वाइडबँड चिप आणि वाढीव श्रेणीसह अचूकता शोधणे अपेक्षित आहे. डिझाइनमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही, परंतु तंत्रज्ञान अपग्रेड केले जात आहे.
अनेक वर्षानंतर Apple त्यांची टिव्ही रिफ्रेश करणार आहे. अपकमिंग मॉडलमध्ये A17 Pro चिपसह N1 वायरलेस चिप आणि Apple इंटेलीजेंस फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. अनेक अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, यावेळी टिव्हीमध्ये सेंटर स्टेज कॅमेरा देखील दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या मदतीने, यूजर मोठ्या स्क्रीनवर फेसटाइमचा आनंद घेऊ शकतील.
या कॉम्पॅक्ट स्पीकरमध्ये Apple ने 2020 नंतर कोणताही बदल केला नाही. आता या डिव्हाईसच्या सेकंड जनरेशन मॉडलमध्ये Apple इंटेलीजेंस सपोर्ट, अधिक चांगला ऑडियो आणि अपग्रेडेड अल्ट्रावाइडबँड चिपसह N1 चिप मिळण्याची देखील शक्यता आहे.
AI ग्लासेसवर फोकस करण्यासाठी कंपनी व्हिजन प्रो बंद करू शकते, परंतु त्यापूर्वी ते Vision Pro 2 लाँच करण्यास तयार आहे. हे महागडे डिव्हाईस यूजर्समध्ये फारसे लोकप्रिय झालेले नाही. नवीन मॉडेलमध्ये आता अपग्रेडेड चिप, कंफर्टेबल स्ट्रॅप आणि ब्लॅक फिनिश असेल. असेही म्हटले जाते की ते सुधारित कॅमेरा आणि एआय वैशिष्ट्यांसह सुसज्ज असू शकते.