iOS 26 Beta 4 Update: Apple ने iPhone यूजर्सना दिलं मोठं सरप्राईज, या फीचर्सचा आहे समावेश! जाणून घ्या सविस्तर
iOS 26 Public Beta रिलीज करण्यापूर्वी Apple ने iOS 26 Beta 4 वर्जन सादर केलं आहे. Apple ने बीटा 3 मध्ये आधीपासूनच उपलब्ध असलेल्या फीचर्समध्ये काही बदल आहेत. युजर्सनी दिलेल्या फिडबॅकनंतर कंपनीने हा बदल केला आहे. कंपनीने बीटा 3 गेल्या आठवड्यात रिलीज केले होते. बीटा 3 नंतर आयफोन युजर्सना अशी अपेक्षा होती की, कंपनी iOS 26 चे पब्लिक बीटा उपलब्ध करू शकते. मात्र कंपनीने युजर्सना सरप्राईज देत iOS 26 Beta 4 वर्जन सादर केले आहे.
iOS 26 Beta 4 वर्जन सादर केल्यानंतर आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, युजर्सना iOS 26 च्या पब्लिक बीटासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. iOS 26 Beta 4 वर्जन मध्ये कंपनीने काही प्रमुख बदल केले आहेत. ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर आपण iOS 26 बीटा 4 आवृत्तीचा डाउनलोड आकार पाहिला तर तो खूपच लोडेड दिसतो. Apple ने लिक्विड ग्लास इंटरफेस डिझाइनमध्ये देखील बरेच बदल केले आहेत. कंपनीने गेल्या बीटा 3 अपडेटमध्ये देखील बरेच बदल केले होते. त्यानंतर आता iOS 26 Beta 4 अपडेट सादर करण्यात आला आहे. कंपनीने केलेल्या या बदलांचा विचार केला तर, असा अंदाज लावला जात आहे की, Apple त्यांच्या नवीन UI मध्ये वेगवेगळे टोन वापरून पाहत आहे. कंपनी युजर्सना ट्रांसपेरेंसी आणि यूजेबिलिटीचे सर्वोत्तम कॉम्बिनेशन ऑफर करत आहे. iOS 26 च्या पब्लिक बीटामध्ये आपल्याला त्याची सर्वोत्तम आवृत्ती मिळू शकते. iOS 26 Beta 4 अपडेटनंतर आता युजर्स iOS 26 च्या पब्लिक बीटा वर्जनची वाट बघत आहेत.
iOS 26 Developer Beta 4 जारी करून कंपनीने सर्व आयफोन्स युजर्सना मोठं सरप्राईज दिलं आहे. सहसा कंपनी बीटा 3 नंतर पब्लिक बीटा रोल आउट करते. कंपनी डेव्हलपर बीटा व्हर्जनमध्येच लिक्विड ग्लास UI दुरुस्त करू इच्छिते. जेणेकरून जेव्हा ते पब्लिक बीटामध्ये जाईल तेव्हा त्यात बरेच बदल करावे लागणार नाहीत. तसेच युजर्सना देखील चांगला अनुभव मिळणार आहे. Apple चं असं म्हणणं आहे की, पब्लिक बीटा जुलैमध्ये रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, कंपनी पुढील आठवड्यापर्यंत कंपनी नवीन सॉफ्टवेअर अपडेटचा सार्वजनिक बीटा रिलीज करू शकते. कंपनी iPhone 11 आणि त्यावरील आयफोन मॉडेल्ससाठी iOS 26 अपडेट रिलीज करणार आहे. तथापि, कंपनी आयफोन XS किंवा Xr यूजर्ससाठी सुरक्षा अपडेट रिलीज करेल.
iOS 26 मधील सर्वात मोठा बदल म्हणजेच त्याचे Liquid Glass डिझाईन. या Liquid Glass डिझाईनमुळे UI ला एक मॉडर्न आणि स्मूद लुक मिळतो. कंपनीने अॅप आयकॉन पुन्हा डिझाइन केले आहेत, अॅनिमेशन अधिक सहजतेने वापरले गेले आहेत आणि होम आणि लॉक स्क्रीनसाठी नवीन कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध आहेत. Camera, Safari आणि Photos सारखे अॅप्स यूजर फ्रेंडली लेआउटमध्ये अपडेट करण्यात आले आहेत.