Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स

iOS 27.2: ॲपलने नवीन iOS 27.2 अपडेट रोलआऊट केले आहे. अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. नव्या अपडेटनंतर यूजर्सना कोणते बदल अनुभवता येणार, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2026 | 07:00 AM
Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स

Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • आयफोन यूजर्ससाठी नवीन iOS 27.2 अपडेट रोलआऊट
  • नव्या अपडेटमध्ये ॲपल म्युझिकच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला
  • आता Siri पूर्वीच्या चॅट्समधील डिटेल्स लक्षात ठेऊ शकणार
ॲपलने आयफोन यूजर्ससाठी नवीन iOS 27.2 अपडेट रोलआऊट केले आहे. या अपडेटमध्ये Siri AI ला अपग्रेड करण्यात आले आहे, ज्यामुळे यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. तसेच नव्या अपडेटमध्ये ॲपल म्युझिकच्या डिझाईनमध्ये देखील काही बदल करण्यात आला आहे. यासोबतच, मेसेज, फोटो, पॉडकास्ट, गेम्स आणि फेस टाईम सारख्या ॲप्समध्ये देखील कंपनीने काही नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. कंपनीने नवीन अपडेट जारी करण्यासोबतच वेगवेगळ्या सॉफ्टवेअर प्रोडक्ट्समधील एकूण 326 सुरक्षा त्रुटी दुरुस्त केल्या आहेत. विशेष म्हणजेच यामधील 160 अधिक त्रुटी आयफोनसंबंधित होत्या.

Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही ‘ही’ प्रोसेस

सिरीसाठी अपग्रेड जारी

ॲपलने नव्या iOS 27.2 अपडेटमध्ये सिरीसाठी काही अपग्रेड जारी केले आहेत. आता Siri पूर्वीच्या चॅट्समधील डिटेल्स लक्षात ठेऊ शकणार आहे. त्यामुळे यूजर्स आधी विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं पुन्हा वाचू शकतात. तसेच, सिरी आता मेसेजमध्ये अटॅच करण्यात आलेल्या फोटो, कॅलेंडर ईव्हेंटमधील लोगो आणि वॉइसमेलमधून देखील डिटेल्स गोळा करू शकणार आहे. इतकंच नाही तर, सफारीच्या हिस्ट्री आणि रीडिंग लिस्टचे रिझल्ट्स देखील सुधारण्यात आले आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

एआय फीचर्सवर अधिक चांगला कंट्रोल

एआय फीचर्सवर यूजर्सना अधिक चांगला कंट्रोल मिळावा यासाठी एक्स्क्लुडेड ॲप्स (वगळलेली ॲप्स) सेटिंग देखील जोडण्यात आली आहे. याच्या मदतीने यूजर्स ठरवू शकणार आहेत की, एआय कोणत्या ॲप्सचा वापर करू शकतो. तसेच, ‘ग्रॅन्युलर टेक्स्ट सिलेक्शन’ फीचरद्वारे यूजर्स सिरीच्या उत्तरातील एखादा विशिष्ट भाग निवडू शकतात आणि कॉपी देखील करू शकतात.

ॲपल म्युझिकसह या ॲप्समध्ये केला बदल

ॲपलने जारी केलेल्या या अपडेटमध्ये ॲपल म्युझिक आयकॉन आणि यूजर इंटरफेसमध्ये सर्वात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मेसेज ॲपमध्ये जलद रिप्लाय करण्यासाठी पर्याय सूचना मिळतील. फोटोजच्या शेअर्ड अल्बम फीचरमध्ये देखील अपग्रेड करण्यात आले आहे. पॉडकास्ट ॲपमध्ये नवीन एपिसोड्स आणि कंटिन्यू प्लेईंगसाठी एक वेगळे सेक्शन जोडण्यात आले आहे.

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत… Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स

गेम्स ॲप अलीकडे खेळलेल्या गेम्स आणि मित्रांशी संबंधित सूचना देईल. याशिवाय, ग्रुप कॉलमध्ये फेस टाईम ड्युअल कॅप्चर फीचर जोडण्यात आले आहे. ॲपल टिव्ही आणि फेस टाईममध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत. एआयने तयार केलेल्या कंटेटसाठी SynthID वॉटरमार्किंगचा सपोर्ट देखील जोडण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple iOS 27.2 अपडेटमध्ये कोणते नवीन फीचर्स मिळणार आहेत?

    Ans: या अपडेटमध्ये Siri AI मध्ये सुधारणा, Apple Music च्या डिझाइनमध्ये बदल आणि Messages, Photos, Podcasts, Games व FaceTime यांसारख्या ॲप्समध्ये नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

  • Que: iOS 27.2 अपडेटनंतर Siri मध्ये काय बदल होणार आहेत?

    Ans: Siri जुन्या चॅट्समधील माहिती लक्षात ठेवू शकणार आहे. तसेच, मेसेजमधील फोटो, कॅलेंडर इव्हेंट्स आणि व्हॉइसमेलमधून माहिती मिळवण्याची क्षमता सुधारण्यात आली आहे.

  • Que: iOS 27.2 मधील Excluded Apps सेटिंग काय आहे?

    Ans: या सेटिंगच्या मदतीने यूजर्सना AI फीचर्ससाठी कोणत्या ॲप्सचा वापर करता येईल, हे नियंत्रित करता येणार आहे.

Web Title: Apple released ios 272 for iphone new features added for siri hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • iphone

संबंधित बातम्या

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत
1

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत

Apple iPhone Duo: अरे देवा! हे काय झालं? 3 लाखांचा फोल्डेबल iPhone स्क्रीनवर स्क्रॅच; बेंड करताच दिसल्या हिरव्या रेषा! Video Viral
2

Apple iPhone Duo: अरे देवा! हे काय झालं? 3 लाखांचा फोल्डेबल iPhone स्क्रीनवर स्क्रॅच; बेंड करताच दिसल्या हिरव्या रेषा! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.