Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत

iPad Mini (2026) Launched: आयफोन 18 प्रो सिरीजनंतर आता भारतात आयपॅड मिनी (2026) लाँच करण्यात आले आहे. हे डिव्हाईस दोन रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. तसेच यामध्ये अनेक दमदार फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2026 | 10:40 AM
भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज... इतकी आहे किंमत

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज... इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • भारतात आयपॅड मिनी (2026) लाँच
  • वायफाय मॉडेलची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये
  • ‘मिडनाईट’ आणि ‘स्टारलाईट’ अशा दोन रंगांच्या पर्यायांत नवीन आयपॅड मिनी लाँच
टेक कंपनी ॲपलने सप्टेंबर महिन्यात त्यांची नवीन आयफोन 18 प्रो सिरीज लाँच केली होती. त्यानंतर आता कंपनीने iPad Mini (2026) मॉडेल लाँच केले आहे. भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन मॉडेलमध्ये 8.5 इंच ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हे या सिरीजमधील पहिले ओएलईडी स्क्रीनवाले मॉडेल आहे. विशेष म्हणजेच यामध्ये लेटेस्ट A20 Pro चिपसेट देण्यात आली आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये एआय फीचर्स देखील मिळणार आहेत.

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत… Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स

भारतात आयपॅड मिनी (2026) ची किंमत

भारतात ॲपल आयपॅड मिनी (2026) च्या वायफाय मॉडेलची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये आहे. तर डिव्हाईसच्या वायफाय+ सेल्युलर मॉडेलची किंमत 1,00,900 रुपये आहे. कंपनी आयपॅड मिनीच्या खरेदीवर एजुकेशन डिस्काऊंट देखील ऑफर करत आहे. यानंतर या डिव्हाईसची किंमत 76,900 रुपये होणार आहे. हे डिव्हाईस 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य: Apple)

‘मिडनाईट’ आणि ‘स्टारलाईट’ अशा दोन रंगांच्या पर्यायांत नवीन आयपॅड मिनी लाँच करण्यात आले आहे. 28 ऑक्टोबरपासून ॲपल इंडिया वेबसाईट आणि ॲपल स्टोअर ॲपवर टॅब्लेटची प्री-ऑर्डर सुरु होणार आहे. तर डिव्हाईसची विक्री 6 नोव्हेंबरपासून ॲपल स्टोअर आणि ऑथराइज्ड रिटेलर्सवर सुरु होणार आहे. या टॅब्लेटसोबतच कंपनी एक नवीन स्मार्ट फोलिओ कव्हर देखील सादर करत आहे, ज्याची किंमत 8,500 रुपये आहे. हे कव्हर नेव्ही ब्लू आणि टॉउप या रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. हे टॅब्लेट ॲपल पेन्सिल प्रो आणि ॲपल पेन्सिल ला सपोर्ट करते, ज्यांच्या किमती अनुक्रमे 11,900 रुपये आणि 7,900 रुपये आहेत.

आयपॅड मिनी (2026) चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

आयपॅड मिनी (2026) मध्ये 8.5 इंच सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या टॅब्लेटचे रेजोल्यूशन 2316×1512 पिक्सेल आहे. टॅब्लेटमध्ये P3 वाइड कलर गॅमटचा सपोर्ट मिळणार आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1,200 निट्सपर्यंत वाढवली जाऊ शकते. कंपनीने प्रखर प्रकाशात स्क्रीनवरील परावर्तन कमी करण्यासाठी ‘नॅनो-टेक्सचर’ डिस्प्लेचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे.

चिपसेट

परफॉर्मंससाठी टॅब्लेटमध्ये 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेला A20 Pro चिपसेट दिला आहे. ॲपलचं असं म्हणणं आहे की, मागील पिढीच्या तुलनेत हे 4.5 पट अधिक वेगवान एआय (AI) कार्यक्षमता आणि 2.7 पट उत्तम ग्राफिक्स कार्यक्षमता देऊ शकते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी टॅब्लेटमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा सेंटर स्टेज सपोर्टने सुसज्ज आहे. तर रिअर कॅमेऱ्याने 60fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा देखील मिळणार आहे.

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या

कनेक्टिविटी पर्याय

कनेक्टिविटीसाठी टॅब्लेटमध्ये वायफाय 7, ब्लूटूथ 6.0 आणि N1 वायरलेस चिप मिळणार आहे. सेल्युलर मॉडेलमध्ये C2 मॉडेम आणि eSIM सपोर्ट देखील मिळणार आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या टॅब्लेटमध्ये IP67 रेटिंग मिळणार आहे. हे टॅब्लेट एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 10 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅकची सुविधा देते. यामध्ये 35W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple iPad Mini (2026) ची भारतातील किंमत किती आहे?

    Ans: Apple iPad Mini (2026) च्या Wi-Fi मॉडेलची सुरुवातीची किंमत ८२,९०० रुपये असून, Wi-Fi + Cellular मॉडेलची किंमत १,००,९०० रुपये आहे.

  • Que: iPad Mini (2026) मध्ये कोणता डिस्प्ले देण्यात आला आहे?

    Ans: या टॅब्लेटमध्ये ८.५ इंचांचा Super Retina XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन २३१६ × १५१२ पिक्सेल आहे.

  • Que: Apple iPad Mini (2026) मध्ये कोणता प्रोसेसर आहे?

    Ans: या टॅब्लेटमध्ये २nm प्रक्रियेवर आधारित A20 Pro चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, मागील पिढीच्या तुलनेत याची AI कार्यक्षमता ४.५ पट अधिक आहे.

Web Title: Ipad mini 2026 launched in global market and india with oled display hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • apple
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत… Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स
1

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत… Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या
2

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या

Oppo Find X10 चा प्रीमियम लूक होणार आणखी खास! चीनमध्ये नवे Forest Green व्हेरिअंट लाँच, ‘या’ दिवशी सुरु होणार विक्री
3

Oppo Find X10 चा प्रीमियम लूक होणार आणखी खास! चीनमध्ये नवे Forest Green व्हेरिअंट लाँच, ‘या’ दिवशी सुरु होणार विक्री

X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा
4

X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.