iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी! रोलआउट झाले Apple चे iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, इंस्टॉल करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
अखेर तो दिवस आलाच! आयफोन युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची वाट बघत होते, तो दिवस आता आला आहे. टेक जायटं कंपनी Apple ने iOS 26 पब्लिक बीटा वर्जन अखेर रोलआऊट केला आहे. याशिवाय काही आयफोन मॉडेल्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे, ज्यांना iOS 26 पब्लिक बीटा वर्जन मिळणार आहेत. त्यामुळे आता यावर्षी WWDC ईव्हेंटमध्ये सादर करण्यात आलेले सर्व फीचर्स आता आयफोन युजर्स वापरू शकणार आहेत. iOS 26 पब्लिक बीटा वर्जन अनेक डेवेलपर बीटा वर्जननंतर रिलीज करण्यात आले आहे.
याच आठवड्यात कंपनीने iOS 26 Beta 4 जारी केले होते, त्यामुळे iOS 26 पब्लिक बीटा वर्जन रोलआऊट करण्यासाठी काही काळ लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता कंपनीने लगेचच iOS 26 पब्लिक बीटा वर्जन रिलीज केलं आहे. त्यामुळे आयफोन युजर्स अत्यंत आनंदित आहेत. iOS 26 चे हे नवीन बीटा व्हर्जन मोठ्या प्रमाणात स्थिर मानले जाते आणि ते यूजर्सना Apple च्या पुढील मोठ्या सॉफ्टवेअर अपडेटची झलक देते. (फोटो सौजन्य – Pinterest)
Liquid Glass डिझाईन: iOS 26 मध्ये एक नवीन विजुअल इंटरफेस देण्यात आले आहे, ज्यामध्ये अॅप्सवर ट्रांसपेरेंट आणि लेयर्ड इफेक्ट पाहायला मिळतो. Photos, Weather आणि Apple Music सारख्या अॅप्समध्ये युजर्सना नवीम डिझाईन पाहायला मिळणार आहे.
Camera आणि Safari मध्ये बदल: कॅमेरा अॅपसाठी नवीन इंटरफेस जारी करण्यात आला आहे, तर Safari आता वेबसाइट्सना फुल-स्क्रीनध्ये दाखवणार आहे.
News अॅपमध्ये AI फीचर्स: News अॅपमध्ये पुन्हा एकदा AI आधारित न्यूज समरी जोडण्यात आली आहे, जी यापूर्वी हटवण्यात आली होती. आता ते पूर्वीपेक्षा चांगल्या आणि अधिक अचूक स्वरूपात परत आले आहे.
Apple Intelligence: या फीचरमुळे डिव्हाईसमध्ये अनेक नवीन AI सुविधा जोडल्या जाणार आहेत. उदाहरणार्थ, मेसेज, फेसटाइम आणि कॉलमध्ये लाईव्ह ट्रांसलेशन, स्क्रीनवर दिसणाऱ्या टेक्स्टचे इंटरेक्शन जसे प्रोडक्ट ओळखणं, चॅटबॉटला प्रश्न विचारणं किंवा ईव्हेंटचे कॅलेंडर तयार करणं.
Photos अॅपमध्ये आलं नवं टॅब लेआउट: आता तुमची संपूर्ण फोटो लायब्ररी आणि कलेक्शन्स वेगवेगळ्या टॅबमध्ये पाहता येतील.
फ्लोटिंग टॅब बार: न्यूज आणि म्युझिक सारख्या अॅप्समध्ये आता स्क्रोलनुसार हलणारे फ्लोटिंग टॅब देण्यात आले आहेत.
Notification Centre मध्ये बदल: नोटिफिकेशन पॅनेल देखील अधिक आकर्षक आणि उपयुक्त बनवण्यात आले आहे.
iOS 26 बीटा वर्जन इंस्टॉल करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून iOS 26 पब्लिक बीटा इंस्टॉल करु शकता.
iOS 26 चा पब्लिक बीटा सर्व iPhone 11 आणि नंतरच्या मॉडेल्सवर उपलब्ध आहे. तसेच, iPhone SE (दुसरी आणि तिसरी Gen) यूजर्स देखील या अपडेटचा लाभ घेऊ शकतात.
Apple iOS 26 चे स्टेबल आणि फाइनल वर्जन सप्टेंबर 2025 मध्ये iPhone 17 सीरीजच्या लाँचिंगसह रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. ज्यांना प्रथम Apple iOS 26 ची नवीन वैशिष्ट्ये वापरून पहायची आहेत, त्यांच्यासाठी पब्लिक बीटा हा सर्वोत्तम मार्ग आहे.