Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S26 Ultra vs iPhone 17 Pro Max: कोण आहे खरा कॅमेरा किंग? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा हे महत्त्वाचे फरक

Samsung Galaxy vs iPhone: आयफोन आणि सॅमसंग या दोन्ही स्मार्टफोन कंपन्यांमध्ये नेहमीच स्पर्धा असते. कंपन्यांचे स्मार्टफोन कॅमेरा क्वालिटीसाठी अत्यंत लोकप्रिय आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये फरक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2026 | 07:45 PM
Samsung Galaxy S26 Ultra vs iPhone 17 Pro Max: कोण आहे खरा कॅमेरा किंग? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा हे महत्त्वाचे फरक

Samsung Galaxy S26 Ultra vs iPhone 17 Pro Max: कोण आहे खरा कॅमेरा किंग? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा हे महत्त्वाचे फरक

Follow Us
Close
Follow Us:
  • फेब्रुवारी 2026 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा लाँच होणार
  • सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रामध्ये 50MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला जाण्याची शक्यता
  • आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 48MP अल्ट्रा वाईड सेंसर आणि 18MP फ्रंट कॅमेरा
जेव्हा बेस्ट कॅमेरा असलेल्या प्रिमियम स्मार्टफोन्सची चर्चा होते, अशावेळी Samsung Galaxy S26 Ultra आणि iPhone 17 Pro Max ही दोन नावं प्रत्येकाच्या मनात येतात. आकर्षक डिझाईन, तगडे फीचर्स आणि डीएसएलआरला टक्कर देणारा स्मार्टफोनचा कॅमेरा.. अ‍ॅपलने सप्टेंबर 2025 मध्ये आयफोन 17 प्रो मॅक्स लाँच केला आहे. तर फेब्रुवारी 2026 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच त्याच्या कॅमेराबाबत मोठ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आगामी स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या बाबतीत आयफोन 17 प्रो मॅक्सला टक्कर देऊ शकतो, अशी चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. तुम्ही जर या दोन्हीपैकी एखादा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी हा लेख वाचा.

आता Translator ची गरज नाही! थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय ‘ऑटो डबिंग फीचर’

अल्ट्रा वाईड आणि सेल्फी कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रामध्ये 50MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये चांगले स्टेबिलाईझेशन आणि जास्त डिटेल्स कॅप्चर करण्याची क्षमता असणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 12MP चा ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. तर आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 48MP अल्ट्रा वाईड सेंसर आणि 18MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे स्पष्ट होतं की, सॅमसंग जास्त रिझोल्यूशन आणि वाईट शॉट्सवर फोकस करते. तर अ‍ॅपल नॅच्युरल स्किन टोन्स आणि सातत्यपूर्ण सेल्फीसाठी योग्य निवड ठरते. (फोटो सौजन्य – Pinterest)

मुख्य कॅमेरा हार्डवेयर

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रामध्ये सॅमसंगचा सिग्नेचर 200MP प्रायमरी सेंसर दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी f/1.4 अपर्चरसह लो लाईट फोटोग्राफी अधिक चांगली होऊ शकते. तर आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा सेंसर शिफ्ट OIS आणि मोठ्या पिक्सेल साईझसह देण्यात आला आहे. अ‍ॅपल केवळ मेगापिक्सेलपेक्षा रंग अचूकता आणि सुसंगततेवर लक्ष केंद्रित करते.

झूम आणि टेलिफोटो क्षमता

झूम फोटोग्राफीमध्ये सॅमसंग नेहमीच पुढे असतो आणि S26 अल्ट्रा देखील हा ट्रेंड सुरुच ठेवेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये 3x टेलिफोटो आणि 5x पेरिस्कोप लेन्स दिले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जास्त फ्लेक्सिबिलीटी मिळू शकते. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये सिंगल 4x पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आहे, जे ऑप्टिकल गुणवत्ता आणि स्थिरीकरणावर लक्ष केंद्रित करते. जर तुम्हाला जास्त झूम ऑफर करणाऱ्या स्मार्टफोन कॅमेऱ्याची गरज असेल तर तुम्ही सॅमसंगची निवड करू शकता.

Google Doodle: विंटर ऑलिम्पिकची चाहूल! गुगल डूडलने वेधलं यूजर्सचं लक्ष, Curling गेमचा भन्नाट अंदाज पाहिलात का?

व्हिडीओ रेकॉर्डिंग

व्हिडीओ रेकॉर्डिंगबद्दल बोलायचं झालं तर अ‍ॅपल आजही लोकांची पहिली निवड आहे. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये प्रोरेस रॉ, अ‍ॅपल लॉग 2, डॉल्बी व्हिजन एचडीआर आणि स्थानिक व्हिडिओ सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग, HDR10+ आणि सुधारित AI स्थिरीकरणासह लाँच केला जाऊ शकतो. सिनेमॅटिक व्हिडिओसाठी आयफोन चांगला पर्याय आहे, तर अधिक नियंत्रण आणि लवचिकतेसाठी सॅमसंग हा चांगला पर्याय आहे.

Web Title: Samsung galaxy s26 ultra vs iphone 17 pro max which is the real camera king read the difference tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • samsung

संबंधित बातम्या

फक्त 33 रुपयांचा EMI, कॅशबॅक 1000 रुपये…; सॅमसंग इंडियाकडून ‘Samsung Finance+’ आकर्षक ऑफर्स लाँच
1

फक्त 33 रुपयांचा EMI, कॅशबॅक 1000 रुपये…; सॅमसंग इंडियाकडून ‘Samsung Finance+’ आकर्षक ऑफर्स लाँच

Satara Apple Farming : महाबळेश्वरच्या पायथ्याशी सफरचंदाची शेती; पर्यटकांची मोठी गर्दी!
2

Satara Apple Farming : महाबळेश्वरच्या पायथ्याशी सफरचंदाची शेती; पर्यटकांची मोठी गर्दी!

ट्रिलियन डॉलरच्या कंपनीला मिळाला नवा चेहरा! कोण आहेत Apple चे नवे CEO जॉन टर्नस? असा आहे त्यांचा प्रवास
3

ट्रिलियन डॉलरच्या कंपनीला मिळाला नवा चेहरा! कोण आहेत Apple चे नवे CEO जॉन टर्नस? असा आहे त्यांचा प्रवास

भारतीय MutuaFund चा Apple वर मोठा डाव! 1800 कोटींची Investment; गुंतवणूकदारांना मिळाला बंपर Return
4

भारतीय MutuaFund चा Apple वर मोठा डाव! 1800 कोटींची Investment; गुंतवणूकदारांना मिळाला बंपर Return

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.