Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसं आहे भारतातलं पहिलं Apple स्टोअर, मुंबईत नेमकं कुठं, ग्राहकांना काय फायदा?

टेक्नॉलॉजीच्या विश्वातील दिग्गज कंपनी ॲपल कंपनी पहिलं रिटेल स्टोअर (Apple Store) सुरू करणार आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यासाठी भारतात आलेले आहेत. हे रिटेल स्टोअर उघडल्यानंतर, ॲपल कंपनी भारतीय बाजारपेठेत ऑफलाइन प्रवेश करेल. मुंबईप्रमाणेच दुसरे अधिकृत स्टोअर 20 एप्रिलला दिल्लीत (New Delhi) सुरू होणार आहे.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Apr 18, 2023 | 10:09 AM
कसं आहे भारतातलं पहिलं Apple स्टोअर, मुंबईत नेमकं कुठं, ग्राहकांना काय फायदा?
Follow Us
Close
Follow Us:

Apple store in Mumbai : टेक्नॉलॉजीच्या विश्वातील दिग्गज कंपनी ॲपल कंपनी पहिलं रिटेल स्टोअर (Apple Store) सुरू करणार आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यासाठी भारतात आलेले आहेत. हे रिटेल स्टोअर उघडल्यानंतर, ॲपल कंपनी भारतीय बाजारपेठेत ऑफलाइन प्रवेश करेल. मुंबईप्रमाणेच दुसरे अधिकृत स्टोअर 20 एप्रिलला दिल्लीत (New Delhi) सुरू होणार आहे. स्थानिक गोष्टींना प्राधान्य देत दोन्ही स्टोअरची रचना करण्यात आली आहे. मायानगरी मुंबईच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीपासून प्रेरणा घेऊन Apple BKC ने आपल्या क्रिएटिव्हमध्ये विविध पेजवर Appleच्या विविध उत्पादनांची आणि सेवांची रंगीत पेंटिंग्ज तयार केली आहेत जी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

बीकेसीमध्ये भारतातील पहिलं ॲपल रिटेल स्टोअर

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये भारतातील पहिले Apple रिटेल स्टोअर सुरु होणार आहे. ते 133 महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आलं आहे. त्यानंतर ते 60 महिन्यांसाठी वाढवण्याचा पर्यायही आहे. हे स्टोअर सुमारे 20 हजार 806 चौरस फुटांचं आहे. या स्टोअरचं भाडं 42 लाख रुपये प्रति महिना इतकं आहे. ॲपलने त्यांची प्रॉडक्ट आतापर्यंत amazon सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विकलेली आहेत.

ग्राहकांसाठी काय?

Apple चे हे स्टोअर सुरू झाल्यानंतर ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल. तसंच प्रॉडक्ट पोर्टफोलियो आणि अनेक ऑफर्सही मिळतील असं म्हटलं जात आहे. प्रॉडक्टसचा इन हँड फील म्हणजेच प्रत्यक्ष ते प्रॉडक्ट कसं चालतं, हे ग्राहकांना पाहता येणार आहे. कंपनी ग्राहकांना Apple Saket आणि Apple BKC चे वॉलपेपर तसेच म्युझिक ऑफर करत आहे. जे युझर्स डाऊनलोड करू शकतात.

स्टोअरची वेळ,कधी सुरू, कधी बंद जाणून घ्या

हे स्टोअर सोमवारी बंद असेल आणि मंगळवार ते रविवार सकाळी 11 ते रात्री 10 यावेळेत सुरू असेल. मुंबईप्रमाणेच दुसरे अधिकृत स्टोअर 20 एप्रिलला दिल्लीत (New Delhi) सुरू होणार आहे.

टिम कुक भारतात

भारतातील पहिल्या वहिल्या ॲपल स्टोअरच्या लाँचिंगसाठी ॲपलचे सीईओ टिम कुक सोमवारी (17 एप्रिल) भारतात आले आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन Apple स्टोअरमध्ये ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी प्रतीक्षा करु शकत नाही, असं ट्वीट स्वत: टिम कुक यांनी केलं आहे. भारतात आल्यानंतर त्यांनी देशातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांची भेट घेतली. सोबतच रिलायन्स रिटेलच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यानंतर त्यांनी मुंबईतील अनेक उद्योजक आणि सेलिब्रिटींचीही गाठभेट घेतली. आपल्या भारत दौऱ्यात टिम कुक बुधवारी (19 एप्रिल) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची भेट घेणार आहेत. कंपनीचे सीईओ टिम कुक म्हणाले की, “भारतात एक सुंदर संस्कृती आणि अफाट ऊर्जा आहे. आमच्या ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी, आणि नवकल्पनांसह एक चांगले भविष्य घडवण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.

Hello, Mumbai! We can’t wait to welcome our customers to the new Apple BKC tomorrow. ?? pic.twitter.com/9V5074OA8W — Tim Cook (@tim_cook) April 17, 2023

2017 मध्ये भारतात पहिल्यांदा आयफोनची निर्मिती

Apple 2017 पासून भारतात आयफोनचे उत्पादन करत आहे आणि त्यामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. रिटेल स्टोअर उघडल्यानंतर, कंपनी आपली पुरवठा साखळी आणखी मजबूत करेल आणि देशभरात आपला व्यवसाय वाढवेल. दरम्यान iPhones सह Apple भारतात iPads आणि AirPods देखील उत्पादन करण्याची योजना आखत आहे.

 

Web Title: Apple to launch official apple retail store mumbai bkc jio world tim cook nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2023 | 10:09 AM

Topics:  

  • apple store

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.