Apple Store: iPhone 17 लाँचपूर्वी कंपनीची मोठी घोषणा! भारतातील या शहरात सुरू होणार Apple चे नवं स्टोअर
टेक जायंट कंपनी Apple लवकरच म्हणजेच पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करणार आहे. ही नवीन आयफोन 17 सिरीज कधी लाँच केली जाणार, त्याचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स काय असणार आहेत, याबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यामुळे सर्वांनाच आयफोनच्या लाँचिंगची उत्सुकता लागली आहे.
अॅपल लवकरच त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच करणार आहे. मात्र ही सिरीज लाँच होण्यापूर्वीच कंपनीने एक नवीन घोषणा केली आहे. कंपनी लवकरच भारतात त्यांचे चौथे अॅपल रिटेल स्टोअर सुरु करणार आहे. यासाठी तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. कंपनीने मंगळवारी घोषणा केली आहे की, अॅपल लवकरच भारतात त्यांचे चौथे रिटेल स्टोअर सुरु करणार आहे. त्यामुळे भारतातील अॅपल ग्राहकांना आगामी आयफोनच्या लाँचिंगपूर्वीच आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील चौथे अॅपल स्टोअर कोरेगांव पार्क पुणे येथे ओपन करण्यात येणार आहे. येत्या काहीच दिवसांच म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी या स्टोअरचे उद्घाटन केले जाणार आहे. ही घोषणा Apple द्वारे बंगळुरुमध्ये करण्यात आलेल्या तिसऱ्या रिटेल स्टोअरच्या घोषणेनंतर करण्यात आली आहे. चौथ्या रिटेल स्टोअरची घोषणा अॅपलने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या मोठ्या आयफोन लाँच कार्यक्रमासाठी अधिकृतपणे आमंत्रणे जारी करण्याच्या काही दिवस आधी केली आहे.
मंगळवारी सकाळी अॅपल कोरेगाव पार्कसाठी बॅरिकेड्सचे अनावरण करण्यात आले. या रिटेल स्टोअरची थीम देखील Apple Hebbal, बंगळुरु सारखी ठेवण्यात आली आहे. असं सांगितलं जात आहे की, भारतातील तिसरं आणि चौथ्या अॅपल स्टोअरमध्ये देशाचा राष्ट्रीय पक्षी आणि अभिमानाचे प्रतीक असलेल्या मोरापासून प्रेरित एक कलाकृती देखील तयार करण्यात आली आहे.
कंपनीने अद्याप पुण्यात सुरु केल्या जाणाऱ्या रिटेल स्टोअर बाबत अधिक माहिती दिली नाही. मात्र काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चौथा आउटलेट सुमारे 10,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेला असू शकतो. हे अशा वेळी घडत आहे जेव्हा नवीन आयफोन 17 सीरीज लाँच होणार आहे. कंपनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या भारतातील ग्राहकांना अनेक मोठे सरप्राईज देणार आहे.
भारतात अॅपल रिटेल स्टोअरची संख्या वाढल्यामुळे ग्राहकांना अॅपल प्रोडक्ट्स पाहण्यासाठी वेगवेगळी ठिकाणं उपलब्ध झाली आहेत. तसेच, ग्राहकांना त्यांच्या आवडीचे प्रोडक्ट्स उत्तम ऑफर्ससह सर्वात कमी किमतीत खरेदी करण्याची संधी देखील मिळणार आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये Apple BKC उघडल्यानंतर, कंपनीने त्याच वर्षी नवी दिल्लीतील साकेत येथे अॅपल स्टोअर देखील उघडले. तथापि, लवकरच देशात तिसरे आणि चौथे रिटेल स्टोअर देखील उघडणार आहेत.