Apple चे iPhone च्या सिक्युरिटी फिचर्सबाबत केले जाणारे दावे खोटे आहेत का? (फोटो सौजन्य - pinterest)
Apple नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी सिक्युरिटी अपडेट जारी करत असते. Apple चा iPhone सर्वात मजबूत सिक्युरिटी फीचर असलेला फोन मानला जातो. कंपनी देखील असा दावा करते. iPhone च्या सिक्युरिटी फीचर्सना मोडणं जवळपास अशक्य आहे, असं देखील मानलं जातं. पण हे खरं आहे का? एका रिपोर्टनुसार, चोरीला गेलेला iPhone सिक्युरिटी फीचर्सचा वापर करून बंद करण्यात आला होता.
हेदेखील वाचा- Apple ने रोलआउट केलं सर्वात मोठं iOS अपडेट! Apple इंटेलिजेंससह अनेक फीचर्सचा समावेश
iPhone चे सिक्युरिटी फीचर्स अत्यंत कमाल मानले जातात. iPhone मध्ये दिलेले सिक्युरिटी फीचर्स तोडणे सोपे नाही. कंपनीने देखील याबाबत अनेकदा विश्वास दाखवला आहे. मात्र कंपनीचा हा दावा खोटा ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपला फोन चोरीला गेला तर चोराने तो बंद करू नये, एवढीच आपली अपेक्षा असते. कारण फोन चालू असेल तर त्याचं लोकेशन शोधणं जास्त सोप्प ठरतं. पण iPhone बंद असताना देखील आपण त्याचं लोकेशन ट्रॅक करू शकतो. हे फीचर सर्व iPhone युजर्सना माहिती असेल. कंपनीने याबाबत अनेक दावे देखील केले आहेत. पण एका रिपोर्टनुसार, चोरीला गेलेला iPhone बंद झाला आणि फोनमधील सर्व सुरक्षा फीचर्स सुरू असताना देखील त्याचं लोकेशन शोधलं गेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एका युजरचा iPhone चोरीला गेला. सर्व संरक्षण असूनही, चोरीला गेलेला आयफोन ऑफलाइन गेला, त्यानंतर आयफोनचं लोकेशन शोधणं कठीण झालं. चोरीला गेलेला आयफोन ॲपलचे स्टोलन डिव्हाईस प्रोटेक्शन आणि स्क्रीन लॉकद्वारे ॲपल आयडी वापरून लॉक करण्यात आला होता. मात्र तरीही हा फोन चोराने बंद केला. iPhone बंद केल्यानंतरही ट्रॅक करता येतो, हा कंपनीचा दावा आहे. मात्र हा दावा इथे खोटा ठरला.
हेदेखील वाचा- Apple ने लाँच केलं Apple Watch For Your Kids फीचर! आता मुलांच्या सुरक्षेची चिंता मिटली
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की iPhone बंद झाल्यानंतर फोनमधील सर्व सुरक्षा फीचर्स सुरू असतानाही यूजरला कोणतेही लोकेशन दाखवले गेले नाही. त्यामुळे युजरसाठी त्याचा फोन शोधणं कठीण झालं. या घटनेनंतर आता कंपनीच्या सिक्युरिटी फीचर्सवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत, जिथे iPhone युजर्सना समस्यांचा सामना करावा लागला आहे. iPhone युजर्सवर नेहमीच कोणतं तरी संकट आलेलं असतं. iPhone च्या सिक्युरिटी अपडेट्सबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता अनेक iPhone युजर्स फिशिंग हल्ल्यांना बळी पडत असल्याचा समोर आलं आहे.
iPhone युजर्सना फिशिंग हल्ल्यांबद्दल सतर्क केलं गेलं आहे. iPhone उघडण्यासाठी ॲपल आयडी आवश्यक आहे, जो चोरांकडे नसतो. हा आयडी मिळविण्यासाठी, चोर युजर्सना एक संदेश पाठवतात, ज्यामध्ये एक लिंक देखील दिली जाते. मेसेजमध्ये यूजर्सना सांगितंल जात की त्यांचा फोन ट्रॅक करण्यात आला आहे. फोनचे लोकेशन जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा. युजरने लिंकवर क्लिक करताच, ॲपलच्या अधिकृत वेबसाइटसारखे एक पेज उघडते. येथे युजर्सची फसवणूक होते आणि त्याचा iPhone परत मिळविण्यासाठी, तो आयडी पासवर्ड भरतो आणि तो थेट चोरांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे चोर सहजपणे आयफोन उघडू शकतात.