Apple ने भारतात Apple Watch For Your Kids हे फीचर लाँच केलं आहे. पालक आणि मुलं यांच्यासाठी हे खास फीचर लाँच करण्यात आलं आहे. या फीचरच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेता येणार आहे.
फोटो सौजन्य - pinterest
Apple ने लहान मुलांच्या सुरक्षेसाठी एक खास फीचर लाँच केलं आहे. Apple Watch For Your Kids असं या फीचरचं नाव आहे. हे फीचर Apple Watch SE, Apple Watch 4 आणि यानंतरच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे.
Apple चे हे फीचर पालकांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. Apple Watch For Your Kids मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित एक फीचर आहे. हे फीचर आता भारतातही उपलब्ध होणार आहे.
Apple Watch For Your Kids फीचरमुळे पालक आपल्या मुलांच्या संपर्कात राहू शकतात, असा कंपनीने दावा केला आहे. मुले घराबाहेर जात असतील तर ते कोणत्या ठिकाणी आहेत, याची माहिती या फीचरच्या माध्यमातून पालकांना मिळणार आहे.
Apple Watch For Your Kids फीचरच्या माध्यमातून पालक आपल्या मुलांच्या आरोग्याची आणि फिटनेसची विशेष काळजी घेऊ शकतील. Apple Watch For Your Kids मुळे मुलांना घराबाहेर स्वातंत्र्य मिळू शकेल आणि तुम्हाला त्यांची काळजी करण्याची गरज नाही.
तुमच्या मुलांकडे स्वतःचा आयफोन नसेल तर तुम्ही किड्स सेल्युलरसह Apple वॉच सेट करू शकता. असे केल्याने मुले त्यांच्या घड्याळावर सहज कॉल करू शकतात. पालक लहान मुलांशी कनेक्ट राहून त्यांना टेक्स्ट मेसेजही पाठवू शकतात.
तुम्ही तुमच्या मुलाला Apple वॉच दिले असेल, तर तुम्ही तुमच्या आयफोनद्वारे हे वॉच अडजस्ट करू शकता. मुलांच्या शाळेच्या वेळेत तुम्ही तुमच्या फोनवरून वॉच कंट्रोल करू शकता.