फोटो सौजन्य - pinterest
लोकप्रिय आणि प्रसिध्द टेक जायंट कंपनी Apple ने लेटेस्ट iOS 18.1 बीटा वर्जन रोल आउट केलं आहे. या वर्जनमध्ये युजर्सना अनेक अॅडव्हान्स फीचर्स मिळणार आहेत. iOS 18.1 बीटा वर्जनच्या Siri मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. याशिवाय AI कॉल रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्शन आणि रायटिंग टूल्स सारखे फीचर्स देखील दिलेले आहेत. नवीन वर्जनमध्ये, Apple Intelligence युजर्सना फक्त त्या सूचना दाखवेल ज्यावर त्यांनी त्वरित अॅक्शन घेतली पाहिजे.
हेदेखील वाचा- Apple ने लाँच केलं Apple Watch For Your Kids फीचर! आता मुलांच्या सुरक्षेची चिंता मिटली
कंपनीने काही दिवसांपूर्वी झालेल्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC 2024) दरम्यान iOS 18 अपडेट लाँच केलं होतं. त्यावेळी कंपनीने iOS 18 ची डेव्हलपर वर्जन रोलआउट केलं होतं. तेव्हापासून हे अपडेट युजर्ससाठी चर्चेचा विषय बनले होते. Apple युजर्स अतिशय आतुरतेने या अपडेटची वाट पाहत होते. आता अखेर हे अपडेट रोलआउट करण्यात आलं आहे. चला तर मग iOS 18.1 मध्ये उपलब्ध असलेल्या मजेदार फीचर्सवर नजर टाकूया.
हेदेखील वाचा- Apple लाँच करणार पहिला फोल्डेबल iPhone! फोल्डेबल मॅकबुक देखील लाँच होण्याची शक्यता
Apple प्रोडक्ट्समधील सिरी हे सर्वांचं आवडतं फीचर आहे. Apple आणि सिरीचं कनेक्शन अगदी खास आहे. प्रत्येक Apple युजर्ससाठी सिरी फीचर अगदी स्पेशल आहे. आता iOS 18.1 मध्ये तुमची आवडती सिरी आणखी अॅडव्हान्स झाली आहे. आता तुम्हाला सिरीशी बोलताना नवीन एज लाइटिंग ॲनिमेशन मिळणार आहे. Siri सोबत बोलत असताना तुम्ही मजकूर आणि व्हॉइस इनपुट दरम्यान स्विच करण्यास सक्षम असाल. आता आयफोनशी संबंधित कोणत्याही समस्येच्या बाबतीत सिरी तुम्हाला मदत करणार आहे. कारण आता सिरीकडे डिव्हाइसची मोठी विंडो आहे. याशिवाय मजकूरात तुम्ही चुकीचे शब्द लिहीले तरी देखील सिरी तुमचे प्रॉम्प्ट समजण्यास सक्षम असेल.
Apple युजर्स आता कॉल रेकॉर्ड करू शकणार आहेत. तसेच तुम्ही हे कॉल रेकॉर्डिंग नोट्स ॲपमध्ये सेव्ह करू शकणार आहेत. नोट्स ॲपमध्ये सेव्ह केलेल्या ऑडिओ क्लिप युजर पुन्हा ऐकू शकतात. युजर्सला ट्रांसक्रिप्ट केलेल्या ऑडिओचा सारांश देखील मिळणार आहे. कॉलमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाला रेकॉर्डिंगबद्दल माहिती दिली जाईल.
मेल टूलमध्ये, युजर्सना ईमेल आणि स्मार्ट रिप्लाय प्रॉम्प्टसाठी सारांश मिळणार आहे. राइटिंग टूलमध्ये, युजर्सना iOS इंटरफेस आणि मेल, नोट्स सारख्या ॲप्सवर मजकूर प्रूफरीड, लिहिण्याचा आणि सारांशित करण्याचा पर्याय मिळणार आहे.
Apple युजर्स Apple इंटेलिजन्सला कोणताही प्रॉम्प्ट पाठवू शकतात, त्यानंतर Apple इंटेलिजन्स तो फोटो शोधून तुमच्यासाठी ॲपवर आणेल. फोटोंव्यतिरिक्त, युजर्स Apple इंटेलिजन्सचा वापर करून व्हिडिओचा कोणताही क्षण शोधू शकतात. Apple इंटेलिजन्सला थीमॅटिक प्रॉम्प्ट देऊन युजर्स फोटो आणि व्हिडिओ क्युरेट करू शकणार आहेत.