Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ग्रीन लाइन्स येत आहेत? या ट्रिकच्या मदतीने दूर होईल समस्या

येत्या काळात अनेक मोबाईल युजर्सना त्यांच्या फोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाइन्सची समस्या उद्भवत आहे. या ग्रीन लाइन्स दूर करण्यासाठी युजर्स नवनवीन उपायांच्या शोधात आहेत. याचे काय कारण असू शकते आणि ते दूर करण्याचा मार्ग काय आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2024 | 08:38 AM
तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ग्रीन लाइन्स येत आहेत? या ट्रिकच्या मदतीने दूर होईल समस्या

तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ग्रीन लाइन्स येत आहेत? या ट्रिकच्या मदतीने दूर होईल समस्या

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही महिन्यांपासून लाखो युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाइन्स दिसत आहेत. या विचित्र समस्येने युजर्स बऱ्याच काळापासून त्रस्त आहेत. OnePlus पासून Samsung पर्यंतच्या ब्रँडेड डिव्हाइसेसना देखील अशा समस्या येत आहेत आणि युजर्स या ग्रीन लाइन्सपासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. अनेक यजर्सचा असा विश्वास आहे की हे सॉफ्टवेअर अपडेट डाउनलोड केल्यानंतर ही समस्या निर्माण होत आहे. याचे कारण काय असू शकते आणि ते सुधारण्याचे मार्ग काय असू शकतात ते समजून घेऊयात.

सॉफ्टवेअरशी संबंधित कारण असू शकते

ग्रीन लाईनशी संबंधित समस्या कधीकधी सॉफ्टवेअरशी संबंधित त्रुटींमुळे उद्भवू शकतात. हे शक्य आहे की तुमच्या फोनसाठी आणलेल्या नवीनतम अपडेटमध्ये बग असू शकतो किंवा विद्यमान सॉफ्टवेअरमध्ये कोणता ग्लीच असू शकतो. याशिवाय काही ॲप्स इन्स्टॉल झाल्यानंतर फोनच्या डिस्प्लेवर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत, या ग्रीन लाइन्स दुरुस्त करणे फार कठीण नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही काही ट्रीक्सचा वापर करून यापासून सुटका मिळवू शकता.

हेदेखील वाचा – स्मार्टफोनमध्ये 5G असूनही इंटरनेट स्लो चालतोय? मग या सोप्या ट्रीक्सचा वापर करा, सुपरफास्ट चालेल इंटरनेट

हार्डवेअर मधील त्रुटी असू शकते कारण

अनेकदा फोन पडल्यानंतर किंवा शारीरिक नुकसान झाल्यास स्क्रीनवर फ्रिन लाइन्स दिसू लागतात. याशिवाय, डिस्प्ले आणि मदरबोर्डमधील कनेक्टर सैल किंवा खराब झाल्यास आणि काहीवेळा मॅन्युफॅक्चरिंग पार्टमधील डिफेक्ट देखील याचे कारण बनल्यास अशी समस्या उद्भवू शकते. इतकेच नाही तर फोन दीर्घकाळ वापरल्यानंतर जास्त गरम होणे किंवा जास्त दाब पडल्यास स्क्रीनवर ग्रीन लाइन्स येऊ शकतात. फोनच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेल्याशिवाय या प्रकारच्या समस्येचे निराकरण केले जाऊ शकत नाही.

फोनवरील ग्रीन लाइन्सना तुम्ही असे फिक्स करू शकता

तुमच्या फोनमधील स्क्रीनवरील ग्रीन लाइन्सची समस्या काही सॉफ्टवेअरमधील त्रुटींशी संबंधित असल्यास, ती दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. सर्व प्रथम तुमचा फोन रीस्टार्ट करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय, तुम्ही तुमच्या फोनमधून अलीकडे इंस्टॉल केलेले ॲप्स काढून टाकण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही फोन सेफ मोडमध्ये अपडेट करू शकता आणि ग्रीन लाइन्स गायब होतात की नाही ते पाहू शकता. जर असे केल्याने तुमच्या फोनमधील या ग्रीन लाइन्स दिसत नसतील तर याचा अर्थ समस्या सॉफ्टवेअरशी संबंधित आहे.

हेदेखील वाचा – इलॉन मस्कने रचला इतिहास, टेस्लाचा नवा रोबोट लाँच, माणसांप्रमाणेच करणार सर्व कामे

दुसरा पर्याय

तुमचा फोन फॅक्टरी रीसेट करून किंवा नवीनतम सॉफ्टवेअर व्हर्जनमध्ये अपडेट करण्याचा दुसरा पर्याय असू शकतो. अनेक ब्रँड्सनी त्यांचे फोन अपडेट करून ही त्रुटी दूर केली आहे. त्यामुळे ग्रीन लाइन्स दूर करण्यासाठी तुम्ही या पर्यायाचा देखील अवलंब करून पाहू शकता. तरीही ते काम करत नसल्यास आणि समस्या हार्डवेअरशी संबंधित असल्यास, तुम्हाला जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.

Web Title: Are you facing green lines issue on your smartphone screen here is how you may fix it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 08:38 AM

Topics:  

  • smartphone tips

संबंधित बातम्या

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
1

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

Tech Tips: स्मार्टफोन सतत गरम का होतो? काय आहेत कारणं आणि सोल्यूशन? टेक एक्सपर्टने काय सांगितलं?
2

Tech Tips: स्मार्टफोन सतत गरम का होतो? काय आहेत कारणं आणि सोल्यूशन? टेक एक्सपर्टने काय सांगितलं?

पुन्हा एकदा Google Pixel 6a चा ब्लास्ट, युजरलाही झाली दुखापत! पावसाळ्यात फोन चार्ज करताना करू नका ‘ही’ चूक
3

पुन्हा एकदा Google Pixel 6a चा ब्लास्ट, युजरलाही झाली दुखापत! पावसाळ्यात फोन चार्ज करताना करू नका ‘ही’ चूक

Tech Tips: Power Bank खरेदी करताना कधीही करू नका या चूका! पैसे होतील बर्बाद आणि फोनही होईल खराब…
4

Tech Tips: Power Bank खरेदी करताना कधीही करू नका या चूका! पैसे होतील बर्बाद आणि फोनही होईल खराब…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.