
Smartphone Buying Guide: नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करताय? फक्त 200MP कॅमेरा पाहू नका, या गोष्टीही तपासा!
स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा ऑफर केला जात असेल तर त्याचा अर्थ असा नाही की, फोटोग्राफी नेहमीच उत्तम दर्जाची होईल. खरं तर फोटोची क्वालिटी अधिक चांगली व्हावी यासाठी सेंसर, लेंस, अपर्चर, नाईट मोड, सॉफ्टवेयर प्रोसेसिंग आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) देखील तितकेच गरजेचे असते. तर 120Hz अमोलेड डिस्प्लेमुळे स्क्रॉलिंग आणि व्हिडीओ पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो. तर स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 5000mAh किंवा त्याहून अधिक असल्यास स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. इतकंच नाही तर स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये मिळणारा चार्जर, स्मार्टफोनची चार्जिंग स्पीड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टबाबत माहिती मिळवा. (फोटो सौजन्य: Pinterest)
स्मार्टफोन खरेदी करताना कंपनीची अपडेट पॉलिसी तपासा. यामुळे तुम्हाला समजू शकेल की, स्मार्टफोनसाठी किती वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट आणि सिक्योरिटी पॅच जारी केले जाणार आहेत, याची माहिती मिळू शकते. यामुळे तुम्हाला समजू शकते की, तुम्ही हा स्मार्टफोन किती वर्षांपर्यंत सुरक्षितपणे वापरू शकता.
स्मार्टफोनचा प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज पाहून खरेदीचा निर्णय घ्या. कारण स्मार्टफोनचा परफॉर्मंस या गोष्टींवर देखील अवलंबून असतो. तुमच्या गरजेनुसार रॅम आणि स्टोरेजची योग्य निवड करा. काही यूजर्ससाठी 256GB स्टोरेज पुरेसे असते तर काही यूजर्ससाठी 512GB स्टोरेजचा पर्याय योग्य ठरतो. तसेच स्मार्टफोनच्या वापरावर रॅमची निवड अवलंबून असते. हेवी गेमिंग किंवा अवघड कामांसाठी स्मार्टफोनमध्ये पुरेसे रॅम गरजेचे असते, अन्यथा फोन हँग होऊ शकतो.
स्मार्टफोनमधील 5G कनेक्टिविटी आणि प्रत्येक नेटवर्कवर उत्तम स्पीड ऑफर केली जाणं, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. इंटरनेट परफॉर्मंस टेलीकॉम ऑपरेटर, रिचार्ज प्लॅन, लोकेशन आणि फोनमधील 5G बँडवर अवलंबून असते. फोन खरेदी करताना, तो तुमच्या नेटवर्क ऑपरेटरसाठी आवश्यक असलेल्या 5G बँड्सना सपोर्ट करतो का, हे तपासा.
Ans: स्मार्टफोन खरेदी करताना प्रोसेसर, रॅम, स्टोरेज, कॅमेरा, डिस्प्ले, बॅटरी, सॉफ्टवेअर अपडेट आणि 5G नेटवर्क बँड तपासणे महत्त्वाचे आहे.
Ans: नाही. फोटोची गुणवत्ता केवळ मेगापिक्सेलवर अवलंबून नसते. कॅमेरा सेंसर, लेन्स, अपर्चर, नाईट मोड आणि OIS यांचाही महत्त्वाचा वाटा असतो.
Ans: सामान्य वापरासाठी 256GB स्टोरेज पुरेसे ठरू शकते. मात्र, अधिक फोटो, व्हिडीओ आणि गेम्स साठवणाऱ्या यूजर्ससाठी 512GB स्टोरेजचा पर्याय चांगला आहे.