फ्लिपकार्ट सेलमधून ऑर्डर केला iPhone 15, एका फोनसाठी आले दोन डिलीव्हरी बॉय! नेमकं प्रकरण काय
ई कॉमर्स फ्लिपकार्टवर बिग बिलीयन डे सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, गॅझेट, होम अप्लायन्सेस, अशा अनेक गोष्टींवर ऑफर सुरु आहेत. शिवाय सर्वांमध्ये क्रेझ असणारा आयफोन देखील स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे या सेलचा फायदा घेत अनेकांनी त्यांचे आवडते स्मार्टफोन ऑर्डर केले आहेत. पण जिथे ऑफर्स असतात आणि ग्राहकांचा फायदा असतो, त्या ठिकाणी स्कॅमर्स आणि घोटाळेबाज देखील असतात. सेल आणि ऑफर्स दरम्यान नागरिकांची फसवूणक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी घोटाळेबाज संधी शोधत असतात. अशीच एक घटना आता बंगळुरुमध्ये देखील घडली आहे.
हेदेखील वाचा- X युजर्सना धक्का! आता ही सुविधा होणार बंद, Elon Musk ने केली मोठी घोषणा
बंगळुरूमधील एका महिलेने फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमधून iPhone 15 च्या 256 GB व्हेरिएंटची ऑर्डर दिली आणि त्यासाठी तिने ओपन बॉक्स डिलिव्हरी (OBD) चा पर्याय निवडला. पण हा बॉक्स डिलीव्हरीसाठी 2 डिलीव्हरी बॉय आले होते. पण त्यातील एका डिलीव्हरी बॉयने बॉक्स उघडण्यास नकार दिला. याबाबत taau_7 या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
त्याने सांगितलं की, त्याच्या बहिणीने फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमधून iPhone 15 च्या 256 GB व्हेरिएंटची ऑर्डर दिली. डिलिव्हरी बॉय आल्यावर त्याने डिलिव्हरीचा बॉक्स उघडण्यास नकार दिला. त्याने ग्राहकाला मोठा बॉक्स असलेले पार्सल ठेवण्याचा आग्रह धरला. त्याने पॅकेज उघडल्याशिवाय आणि त्यातील सामग्री तपासल्याशिवाय बॉक्स घेण्यास नकार दिला. तेवढ्यात आणखी एक ‘डिलिव्हरी एजंट’ हातात छोटेसे पॅकेज घेऊन तिथे दाखल झाला. पहिल्या डिलीव्हरी बॉयने बॉक्स उघडण्यास नकार दिला आणि त्याने सांगितलं की, तो बॉक्स डिलिव्हरी करू शकत नाही आणि तो बॉक्स आहे तसा स्वीकारला जाईल. त्यानंतर दुसऱ्या डिलीव्हरी बॉयने बॉक्स उघडत युजरला त्याचा आयफोन दिला. या संपूर्ण घटनेनंतर जेव्हा पहिल्या डिलीव्हरी बॉयची चौकशी केली, त्यानंतर समोर आलं की तो घोटाळेबाज होता.
हेदेखील वाचा- BSNL मुळे Jio ची डोकेदुखी वाढणार, स्वस्त रिचार्ज प्लॅन नंतर आता कंपनी लवकरच लाँच करणार परवडणारे स्मार्टफोन
फ्लिपकार्टच्या ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्यायांतर्गत, ग्राहकांना पॅकेज उघडण्याचा आणि ते स्वीकारण्यापूर्वी त्यातील सामग्री तपासण्याचा पर्याय मिळतो. ही सेवा ग्राहकांना त्यांनी ऑर्डर केलेली वस्तू मिळते याची खात्री करण्यासाठी डिझाइन केले आहे. पण एखादा डिलीव्हरी बॉय ही डिलिव्हरी बॉक्स उघण्यासाठी नकार देत असेल, तर यामध्ये घोटाळा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी डिलीव्हरी स्विकारू नका आणि त्वरीत कंपनीच्या कस्टमर केअरला याबाबत तक्रार करा.
सणानिमित्त फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल सुरू आहे. सेलमध्ये मोबाईलसह अनेक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आयफोनचे चाहतेही या सेलमध्ये जोरदार खरेदी करत आहेत कारण Apple iPhone चांगल्या सवलतीत येथून खरेदी करता येईल. पण जर तुम्हीही ऑनलाइन सेलमधून काही ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जेणेकरून बंगळुरूमधील महिलेसोबत जे घडले ते तुमच्यासोबत घडू नये.