BSNL मुळे Jio ची डोकेदुखी वाढणार, स्वस्त रिचार्ज प्लॅन नंतर आता कंपनी लवकरच लाँच करणार परवडणारे स्मार्टफोन
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ने इतर टेलिकॉम कंपन्याच्या तुलनेत स्वस्त रिचार्ज प्लॅन अजूनही सुरू ठेवले आहेत. त्यामुळे अनेक युजर्स Jio, Airtel आणि VI सोडून BSNL कडे वळले. स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या ऑफर नंतर आता कंपनी ग्राहकांसाठी परवडणारे स्मार्टफोन लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने कार्बन मोबाईलसोबत भागीदारी केली आहे. कार्बन आणि BSNL संयुक्तपणे 4G कनेक्टिव्हिटीसह फीचर फोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
हेदेखील वाचा- Apple ग्राहकांसाठी घेऊन येतंय एक स्पेशल सरप्राईज, लवकरच ‘हे’ डिव्हाईस होणार लाँच
कार्बन आणि BSNL च्या 4G कनेक्टिव्हिटी फीचर फोननंतर ग्राहकांना 4G सेवा वापरण्यासाठी महागड्या टच फोनची गरज भासणार नाही. या फीचर फोनसह BSNL रिलायन्स Jio च्या भारत 4G फोनला टक्कर देईल. भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi (Vodafone-Idea) ने रिचार्ज प्लॅनच्या दरात वाढ केल्यानंतर BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) युजर्समध्ये खूप लोकप्रिय होत आहे. मोठ्या संख्येने युजर्स त्यांचे सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करत आहेत. सरकारी कंपनीच्या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनमुळे तसेच 4G नेटवर्क सुरू झाल्यामुळे युजर्स BSNL कडे वळत आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
With the signing of a landmark #MoU, #BSNL and #KarbonnMobiles to introduce an exclusive SIM handset bundling offer under the Bharat 4G companion policy. Together, we aim to bring affordable 4G connectivity to every corner of the nation.#BSNLDay #BSNLFoundationDay pic.twitter.com/M37lXjhaGP
— BSNL India (@BSNLCorporate) October 1, 2024
BSNL चे बहुतांश ग्राहक हे ग्रामीण भागातील आहेत. अशा परिस्थितीत कंपनी फीचर फोन लाँच करण्यासारखे महत्वाचे पाऊल उचलत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून या फीचर फोनबाबत माहिती देण्यात आली आहे. BSNL फोनची बाजारात थेट स्पर्धा Jio Bharat 4G शी असेल, जी स्वस्त दरात हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी देते.
हेदेखील वाचा- जगातील चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ति बनला Mark Zuckerberg, एवढ्या संपत्तीसह केला विक्रम
कार्बनच्या फीचर मोबाइलसह, वापरकर्त्यांना BSNL ची 4G सेवा वापरण्यासाठी महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याची आवश्यकता नाही. BSNL सध्या वेगाने आपले नेटवर्क अपग्रेड करत आहे. देशभरात 4G नेटवर्क आणण्यासोबतच कंपनी अनेक ठिकाणी 5G ची चाचणी देखील करत आहे. त्यामुळे लवकरच कंपनीचे 5G नेटवर्क देखील सुरू होणार आहे.
4G आणि 5G नेटवर्क अपग्रेडसोबत, कंपनी स्पॅम फ्री नेटवर्कवर काम करत आहे. यासाठी कंपनीने AI आधारित तंत्रज्ञान सादर करण्याची घोषणा केली आहे. BSNL ची ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तथापि, त्याची अधिकृत घोषणा इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 दरम्यान केली जाणारं असल्याचं सांगितलं जातं आहे. यावर्षी 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कंपनीच्या AI आधारित तंत्रज्ञान्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. BSNL च्या या घोषेनंतर सध्या ग्राहक BSNL फीचर फोन आणि AI आधारित तंत्रज्ञान्याची वाट पाहत आहेत. BSNL च्या स्वस्त रिचार्ज प्लॅननंतर आता BSNL चे परवडणारे 4G फीचर फोन देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरतील यात काही शंकाच नाही.