फोटो सौजन्य - pinterest
Mark Zuckerberg च्या Meta कपंनीला मोठा झटका बसला आहे. बायोमेट्रिक प्रायव्हसी नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी Mark Zuckerberg च्या Meta कपंनीला सुमारे 1.4 अब्ज डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून Mark Zuckerberg च्या Meta कपंनीने बायोमेट्रिक प्रायव्हसी नियमांचे उल्लंघण केल्याचे सांगितलं जात होतं. याप्रकरणी चौकशी देखील सुरु होती. Meta वर केस रिकॉग्नाइजेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करून टेक्सासमधील लाखो लोकांचा बायोमेट्रिक डेटा कलेक्ट आणि परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप होता. यामध्ये फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडीओचा समावेश होता. आता याप्रकरणी सेटलमेंटसाठी Meta ने सहमती दर्शवली असून कंपनीला सेटलमेंटसाठी 1.4 अब्ज डॉलरचा दंड भरावा लागणार आहे.
हेदेखील वाचा- नायजेरियाने Meta ला ठोठावला 22 कोटी रुपयांचा दंड; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
टेक्सासचे ॲटर्नी जनरल केन पॅक्स्टन (Ken Paxton) यांच्या मते, राज्यातील ही सर्वात मोठी सेटलमेंट आहे. ही ऐतिहासिक सेटलमेंट आम्हाला जगातील टेक दिग्गजांच्या विरोधात उभे राहण्यासाठी, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना आणि टेक्सन्सच्या गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांना जबाबदार धरण्यासाठी वचनबद्धता देते. कराराबाबत Meta ने म्हटलं आहे की, आम्हाला हे प्रकरण सोडावायचं आहे. यानंतर आम्हाला टेक्सासमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. यामध्ये डेटा तयार करणे देखील समाविष्ट आहे.
हेदेखील वाचा- इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील ‘Made with AI’ लेबल बदललं; Meta ची घोषणा
2022 मध्ये Meta विरोधात टेक्सास कोर्टात हा खटला दाखल करण्यात आला होता. केस रिकॉग्नाइजेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करून टेक्सासमधील लाखो लोकांचा बायोमेट्रिक डेटा कलेक्ट आणि परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप Meta वर होता. याप्रकरणी आता दोन्ही कंपन्यांनी सेटलमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत Meta ला 1.4 अब्ज डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी 2021 मध्येही Meta विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये Meta वर गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर या प्रकरणात 650 दशलक्ष रुपयांची सेटलमेंट करण्यात आली. यावेळी, कंपनीने फेस रिकॉग्नाइजेशन सिस्टम बंद करण्याबद्दल आणि लाखो वापरकर्त्यांच्या फिंगरप्रिंट्स हटविण्याबद्दल बोलले होते.
Meta प्रमाणेच Google वर देखील प्रायव्हसी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला असून कंपनीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. Google ने Google फोटो, Google असिस्टंट आणि नेक्स्ट हब मॅक्स यांसारख्या उपकरणांद्वारे वापरकर्त्यांचा बायोमेट्रिक डेटा गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Google वर सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.