
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन लक रॉयल ईव्हेंट, 'या' स्पेशल गन स्किन मिळणार पूर्णपणे मोफत! जाणून घ्या
फ्री फायर मॅक्समध्ये Bizon Ring ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा गेम पुढील 10 दिवसांसाठी सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये तुम्ही सहभागी होऊन Bizon Metalgreymon Power गन स्किन आणि Loot Box Digitama सारखे आइटम्स फ्रीमध्ये मिळवू शकणार आहात. हा गेममधील एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये फ्री रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. प्रत्येक स्पिनवेळी यूजर्सना एक गेमिंग आयटम मिळणार आहे आणि प्रत्येक स्पिनवर यूजर्सना अवॉर्ड मिळणार आहे. (फोटो सौजन्य –YouTube)
Bizon Ring ईव्हेंटमध्ये प्रत्येक स्पिनसाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड खर्च करावं लागणार आहे. डायमंड खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. एकदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स आणि पाचवेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 100 डायमंड्स खर्च करावे लागण्यची शक्यता आहे.