Blinkit पासपोर्ट साईज फोटोची करणार होम डिलीवरी (फोटो सौजन्य - pinterest)
आता पासपोर्ट साईज फोटोसाठी तुम्हाला कोणत्याही स्टुडिओमध्ये जाण्याची गरज नाही. क्विक कॉमर्स सर्विस प्रोवाइडर Blinkit तुम्हाला 10 मिनिटांत पासपोर्ट साईज फोटोची होम डिलीव्हरी देणार आहे. Blinkit ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन सेवा सुरु केली आहे. त्यामुळे ॲप युजर्स आता Blinkit वापरून पासपोर्ट साईज फोटो ऑर्डर करू शकतात. यासाठी यूजर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही केवळ 10 मिनिटांत तुमच्या पासपोर्ट साईज फोटोची डिलीव्हरी मिळवू शकता.
हेदेखील वाचा- WhatsApp वर Meta AI व्हॉईससह आले एकूण 5 नवे फीचर! युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार
आपल्याला अनेक प्रोफेशनल कामांसाठी पासपोर्ट साईज फोटोची गरज असते. पण अनेकदा हे फोटो आपल्याला वेळेत सापडत नाहीत, त्यामुळे आपली कामं रखडतात. पण आता असं होणार नाही. तुम्ही Blinkit वरून फोटो ऑर्डर करू शकतात. केवळ 10 मिनिटांत तुम्हाला या फोटोची डिलिव्हरी मिळणार आहे. या नवीन फीचरमुळे कंपनीने अनेक युजर्सच्या समस्येचा उपाय आणला आहे. आता युजर्सना फोटो शोधण्यासाठी जास्त कष्ट करावे लागणार नाही. केवळ Blinkit ओपन करा आणि फोटो ऑर्डर करा आणि पुढील 10 मिनिटांत तुमच्या फोटोची डिलीव्हरी केली जाईल.
कंपनीने ही सेवा सध्या दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सुरु केली आहे. लवकरच ही सेवा पूर्ण देशात सुरु केली जाईल अशी आशा आहे, ज्यामुळे सर्व Blinkit युजर्सची पासपोर्ट साईज फोटो शोधण्याची समस्या दूर होईल. या नवीन फीचरबाबत Blinkit चे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी माहिती दिली आहे. अलबिंदर धिंडसा यांनी सांगितलं की, व्हिसा, कागदपत्रे, प्रवेशपत्र किंवा भाडे करारासाठी तुम्हाला कधी पासपोर्ट आकाराच्या फोटोची आवश्यकता असते का? दिल्ली आणि गुरुग्राममधील Blinkit ग्राहकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो आजपासून त्यांना 10 मिनिटांत उपलब्ध होईल. आम्ही ही नवीन सेवा सुरू करण्यास उत्सुक आहोत आणि तुमचा अभिप्राय आम्हाला ही सेवा पूर्ण करण्यात मदत करेल. हळूहळू आम्ही ही सेवा इतर शहरांमध्येही वाढवू.
हेदेखील वाचा- ChatGPT वर आलं नवीन अपडेट, आता युजर्स विनामुल्य तयार करू शकतील AI इमेज
आतापर्यंत आपण किराणा सामानापासून ते इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपर्यंत सर्व काही ऑनलाईन ऑर्डर करू शकत होतो. पण आता आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो देखील ऑनलाईन ऑर्डर करता येणार आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.