युजर्स ChatGPT मध्ये विनामुल्य तयार करू शकतील AI इमेज (फोटो सौजन्य - pinterest)
सध्या मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं AI टूल म्हणजे OpenAI च्या मालकिचे ChatGPT. ChatGPT लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. 2022 मध्ये AI चॅटबोट ChatGPT लाँच करण्यात आलं. ChatGPT जगातील पहिलं AI चॅटबोट आहे. OpenAI ने 2022 मध्ये ChatGPT लाँच केल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांचे स्वत:चे चॅटबोट लाँच केले. पण तरिही लोकांमध्ये ChatGPT ची क्रेझ कायम आहे. ChatGPT च्या मदतीने आपली अनेक कामं सहज शक्य होतात.
हेदेखील वाचा- लवकरच लाँच होणार YouTube Sleep Timer फीचर; एका विशिष्ट वेळी आपोआप थांबणार व्हिडीओ
ChatGPT चा वाढता वापर पाहता कंपनी त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. आता देखील ChatGPT मध्ये एक नवीन अपडेट लाँच करण्यात आलं आहे. या अपडेटच्या मदतीने युजर्स ChatGPT मध्ये विनामुल्य AI इमेज तयार करू शकतील. OpenAI चे ChatGPT हे AI जगतातील एक उत्तम ॲप मानले जाते. ChatGPT मध्ये एक नवीन फीचर लाँच झालं आहे. या फीचरची युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. OpenAI ने ChatGPT युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे, ज्याच्या मदतीने आता युजर्स सहजपणे AI इमेज तयार करण्यास सक्षम असतील. एवढेच नाही तर कंपनीने ही सुविधा पूर्णपणे मोफत दिली आहे, म्हणजेच आता यूजर्स मोफत AI इमेज बनवू शकणार आहेत.
आता ChataGPT च्या मोफत आवृत्तीचे युजर्स Dall-E 3 च्या मदतीने सहजपणे AI इमेज तयार करू शकतील. OpenAI ने आपल्या अधिकृत X अकाऊंटवर या नवीन फीचरची माहिती दिली आहे. युजर्स एका दिवसात केवळ 2 AI इमेज तयार करण्यास सक्षम असतील. यापूर्वी AI इमेज तयार करण्याची सुविधा फक्त प्रीमियम यूजर्ससाठी उपलब्ध होती.
हेदेखील वाचा- यूट्यूबच्या माजी सीईओ Susan Wojcicki यांचे निधन; सुंदर पिचाई यांनी व्यक्त केला शोक
पण आता ही सुविधा सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून देणं, हे कंपनीच्या बाजूने मोठं पाऊल मानलं जात आहे. पण ChataGPT च्या मोफत आवृत्तीचे युजर्सासाठी AI इमेज तयार करण्यासाठी मर्यादा घालण्यात आली आहे. युजर्स एका दिवसात फक्त 2 AI इमेज तयार करण्यास सक्षम असतील. त्यामुळे जर तुम्हाला दोनपेक्षा अधिक AI इमेज तयार करायच्या असल्यास प्रिमियम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे.