स्टाईल आणि फीचर्सचाा परफेक्ट कॉम्बो! boAt ची प्रिमियम स्मार्टवॉच भारतात लाँच, केवळ इतक्या किंमतीत मिळणार तगडी बॅटरी लाईफ
कंपनीने भारतात लाँच केलेल्या boAt Valour Watch 1R ची सुरुवातीची किंमत 4,499 रुपये आहे. हे नवीन स्मार्टवॉच इंपीरियल लेदर, ओब्सीडियन ब्लॅक, ओक लेदर आणि स्टील ब्लॅक फिनिशमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक हे स्मार्टवॉच अमेझॉन, फ्लिपकार्ट, बोटच्या ऑफिशियल वेबसाइट आणि भारतातील निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – boAt)
boAt Valour Watch 1R मध्ये 1.43-इंच 3D AMOLED डिस्प्ले आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 1,000 निट्स आहे आणि चांगल्या व्हिज्युअल खोलीसाठी या डिव्हाईसमध्ये कर्व्ड ग्लास डिजाइन देण्यात आले आहे. हे डिव्हाईस 100 हून अधिक क्लाउड वॉच फेसेसला सपोर्ट करते. यासोबतच या स्मार्टवॉचमध्ये टर्न-बाय-टर्न नेविगेशन आणि कस्टम रिमाइंडर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच X2 प्रोसेसरवर आधारित आहे, जे हाय-एक्यूरेसी एल्गोरिदमसह काम करते.
या डिव्हाईसमध्येएक AI कोच समाविष्ट आहे, जो एक्टिविटीज ओळखते आणि मार्गदर्शन देते. यासोबतच यामध्ये AI-बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम देखील आहे. boAt Valour Watch 1R 700 हून अधिक स्पोर्ट्स मोड्सला देखील सपोर्ट करते. हेल्थ ट्रॅकिंगसाठी हे डिव्हाईस हार्ट रेट, SpO2 लेवल, स्ट्रेस आणि स्लीप मॉनिटर करते आणि यासोबतच यामध्ये हार्ट रेट व्हेरिएबिलिटी आणि VO2 मॅक्स यांसारख्या मेट्रिक्ससोबतच रिकव्हरीची माहिती देखील मिळते. boAt Valour Watch 1R ब्लूटूथ 5.3 कनेक्टिविटीला सपोर्ट करते. या डिव्हाईसमध्ये 300mAh बॅटरी दिली आहे. ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, डिव्हाईस 7 ते 10 दिवसांपर्यंत चालते. हे मॅग्नेटिक चार्जिंगला देखील सपोर्ट करते. याच्या मदतीने चार्ज होण्यासाठी सुमारे 2 तासांचा कालावधी लागतो.
iPhone यूजर्स सावधान! Apple ने दिला इशारा, आत्ताच अपडेट करा तुमचे डिव्हाईस; अन्यथा…
या स्मार्टवॉचमध्ये हलकी एल्युमिनियम बॉडी आहे, ज्यामध्ये मॅट फिनिश दिले आहे आणि हे डिव्हाईस संपूर्ण डिव्हाईस दिवस घालण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. घाम आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये 3 ATM रेटिंग दिले आहे, मात्र कंपनीने मानक IP रेटिंग निर्दिष्ट केलेले नाही. याचे माप 265.1 x 47 x 12.3mm आहे.






