यंदाची भाऊबीज करा खास! बहिणीला गिफ्ट करा स्मार्टवॉच; स्टाइल आणि फिटनेसचा मेळ साधणारे ५ पर्याय
तुमच्या बहिणीला फिटनेसची आवड असेल, व्यायाम करताना अॅक्टिव्हिटी ट्रॅक करायची असेल किंवा दैनंदिन वापरासाठी आकर्षक टेक अॅक्सेसरी हवी असेल, तर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. AMOLED डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग, विविध स्पोर्ट्स मोड्स, हार्ट रेट आणि SpO₂ मॉनिटरिंग अशा सुविधांसह येणाऱ्या या पाच स्मार्टवॉचचा विचार तुम्ही करू शकता.
बहिणीला स्टायलिश आणि फीचर्सने परिपूर्ण स्मार्टवॉच भेट द्यायचे असेल, तर boAt Ultima Vogue 2 हा पर्याय पाहता येईल. या स्मार्टवॉचमध्ये 1.96 इंचांचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि IP68 वॉटर रेझिस्टन्सची सुविधा मिळते. याशिवाय हार्ट रेट, SpO₂, तणावाची पातळी आणि झोपेचे निरीक्षण करणारी हेल्थ मॉनिटरिंग वैशिष्ट्येही आहेत. 300mAh क्षमतेची बॅटरी असून वापराच्या पद्धतीनुसार ती 10 दिवसांपर्यंत टिकू शकते.
दैनंदिन वापरासाठी आकर्षक डिझाइन आणि उपयोगी फीचर्स असलेले स्मार्टवॉच हवे असेल, तर boAt Chrome Iris हा पर्याय ठरू शकतो. यात 1.32 इंचांचा AMOLED डिस्प्ले असून 1,000 निट्सपर्यंत ब्राइटनेस मिळते. Bluetooth 5.4 कनेक्टिव्हिटी आणि ब्लूटूथ कॉलिंगमुळे हे स्मार्टवॉच वापरणे सोयीचे ठरते. यामध्ये 40 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. तसेच हार्ट रेट, SpO₂, झोप आणि तणावाचे निरीक्षण करण्याची सुविधाही आहे. IP68 रेटिंग असलेल्या या स्मार्टवॉचची बॅटरी चार दिवसांपर्यंत टिकू शकते.
बहिणीला वेगळ्या डिझाइनच्या अॅक्सेसरीज आवडत असतील, तर CMF Watch Pro 2 हा आकर्षक पर्याय आहे. या स्मार्टवॉचचे वैशिष्ट्य म्हणजे यात बदलता येणारे बेझल आणि स्ट्रॅप्स देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या आवडीनुसार वॉचचा लूक बदलता येतो. यामध्ये 1.32 इंचांचा AMOLED डिस्प्ले, ऑलवेज ऑन डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स, हार्ट रेट आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याची सुविधा, मासिक पाळीच्या चक्राचे ट्रॅकिंग आणि मल्टी-सिस्टम GPS देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार याची बॅटरी 11 दिवसांपर्यंत टिकू शकते.
मोठा डिस्प्ले आणि चांगला बॅटरी बॅकअप पसंत करणाऱ्या बहिणीसाठी Redmi Watch Move हा आणखी एक पर्याय आहे. यात 1.85 इंचांचा AMOLED डिस्प्ले असून त्याची ब्राइटनेस 600 निट्सपर्यंत आहे. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि IP68 रेटिंग मिळते. तसेच 140 हून अधिक स्पोर्ट्स मोड्ससह हार्ट रेट, SpO₂, झोप आणि तणावाचे निरीक्षण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार सामान्य वापरात याची बॅटरी 14 दिवसांपर्यंत टिकू शकते.
फिटनेस ट्रॅकिंग आणि मैदानी उपक्रमांची आवड असलेल्या बहिणीसाठी Amazfit Bip 5 हा विचार करण्यासारखा पर्याय आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.91 इंचांचा डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये चार सॅटेलाइट पोझिशनिंग सिस्टिम्स देण्यात आल्या आहेत.
याशिवाय 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स तसेच हार्ट रेट, SpO₂ आणि तणावाचे निरीक्षण करण्याची सुविधा आहे. सामान्य वापरात याची बॅटरी 10 दिवसांपर्यंत टिकू शकते, असा कंपनीचा दावा आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करायचा? एडिटिंग करताना लक्षात ठेवा ‘या’ टिप्स, मिळतील चांगले व्ह्यूज
स्मार्टवॉच ही केवळ वेळ पाहण्याची किंवा स्टायलिश दिसण्यासाठी वापरली जाणारी अॅक्सेसरी नाही, तर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे टेक गॅझेट आहे. फिटनेसची आवड, तंत्रज्ञानाची उत्सुकता आणि वैयक्तिक स्टाइल या गोष्टी लक्षात घेऊन बहिणीसाठी योग्य स्मार्टवॉच निवडता येईल. यंदाच्या भाऊबीजेला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आणि उपयोगी गिफ्ट द्यायचे असेल, तर या पाच स्मार्टवॉचपैकी एखादा पर्याय नक्की विचारात घ्या. खरेदी करण्यापूर्वी संबंधित मॉडेलची सध्याची किंमत, उपलब्धता आणि फीचर्स अधिकृत विक्रेत्याकडे तपासून घ्या.






