
BSNL Recharge Plan: करोडो यूजर्सना कंपनीने दिलं नवीन वर्षांचं गिफ्ट! या 4 प्लॅन्समध्ये वाढवला डेटा, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध
कंपनीने काही लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्समधील डेटा लिमिट वाढवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने ही ऑफर सुरु केली असली तरी देखील रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. ही खास बीएसएनएल ऑफर 31 जानेवारीपर्यंत व्हॅलिड आहे. म्हणजेच यूजर्स 31 जानेवारीपर्यंत त्याच किंमतीत जास्त डेटाचा फायदा घेऊ शकणार आहेत. बीएसएनएलने अलीकडेच त्यांच्या एक्स अकाऊंटवर या प्लॅनची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, यूजर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अधिक डेटा ऑफर केला जाणार आहे. या ऑफर्स कोणत्या प्लॅन्ससाठी उपलब्ध आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी कंपनीने त्यांच्या एका वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या प्लॅनमध्ये डेटा बेनिफिट वाढवले आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये आधी 2GB डेटा उपलब्ध होता. मात्र आता कंपनी या प्लॅनमध्ये 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा ऑफर करत आहे.
बीएसएनएलच्या दुसऱ्या प्लॅनची किंमत 485 रुपये आहे. कंपनी यापूर्वी या प्लॅनमध्ये 2GB डेटा ऑफर करत होती. मात्र आता या प्लॅनमध्ये रोज 2.5GB डेटा ऑफर केला जात आहे. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 72 दिवसांची आहे.
यादीमध्ये तिसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 347 रुपये आहे. कंपनी यापूर्वी या प्लॅनमध्ये 2GB डेटा ऑफर करत होती. मात्र आता या प्लॅनमध्ये रोज 2.5GB डेटा ऑफर केला जात आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 50 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा मिळते.
Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स
या यादीमधील शेवटच्या प्लॅनची किंमत 225 रुपये आहे, ज्याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनध्ये 2.5GB डेटा ऑफर केला जात होता. मात्र आता या प्लॅनमध्ये 3GB डेटा ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. जर तुम्ही स्वस्त मंथली रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर हा एक चांगला पर्याय असू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर डेटा मिळेल.
Ans: ग्रामीण आणि अर्धशहरी भागात BSNL चे नेटवर्क मजबूत मानले जाते.
Ans: नवीन तसेच जुने BSNL ग्राहक या न्यू ईयर ऑफरचा फायदा घेऊ शकतात.
Ans: होय. BSNL कमी किमतीत जास्त डेटा देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते, विशेषतः ग्रामीण भागात.