
BSNL Recharge Plan: विद्यार्थ्यांसाठी सरकारी टेलिकॉम कंपनी घेऊन आली विशेष प्लॅन, 100GB डेटासह मिळणार हे फायदे
BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय… सोशल मीडियावर भडकले यूजर्स
कंपनीची ही ऑफर एक लिमिटेड-पीरियड ऑफर आहे. हा प्लॅन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. सुमारे 8.96 रुपये प्रतिदिन म्हणजेच 251 रुपये खर्च करून विद्यार्थी हा प्लॅन खरेदी करू शकतात. या प्लॅनमध्ये यूजर्सना कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सारख्या सुविधा ऑफर केल्या जातात. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्लॅनची किंमत 251 रुपये आहे. हा प्लॅन ग्राहकांसाठी 13 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 100GB हाई-स्पीड डेटा, रोज 100 SMS ची सुविधा दिली जाते. ही ऑफर सर्व बीएसएनएल ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि ती फक्त नवीन वापरकर्त्यांपुरती मर्यादित नाही. ग्राहक जवळच्या BSNL CSC सेंटरवरून हा प्लॅन खरेदी करू शकतात किंवा 1800-180-1503 वर कॉल करू शकतात किंवा bsnl.co.in ला भेट देऊ शकतात.
BSNL प्रमुख रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी संपूर्ण देशात त्यांचे स्वदेशी 4G नेटवर्क स्थापित करण्याचा आणि अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशावेळीच कंपनीने हा प्लॅन लाँच केला आहे. त्यांनी सांगितलं आहे की, भारत जगातील पाचवा देश आहे, ज्याने स्वत:ची 4G टेक्नोलॉजी विकसित केली आहे. कंपनी गेल्या अनेक काळापासून त्यांच्या नेटवर्कचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. रवी यांनी सांगितलं आहे की, डेटाने समृद्ध असलेल्या या योजनेमुळे विद्यार्थ्यांना ‘मेक इन इंडिया’ 4G नेटवर्कचा सर्वोत्तम अनुभव मिळेल. 100GB डेटासह, त्यांना पूर्ण 28 दिवसांसाठी नवीन नेटवर्कची गुणवत्ता तपासण्याची संधी मिळेल.
BSNL त्यांच्या ग्राहकांना कमी पैशांत दिर्घकाळ चालणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. मात्र आता कंपनीने एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे BSNL च्या सर्व यूजर्सना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या नसल्या तरी देखील काही रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही प्लॅन्सची व्हॅलिडीटी 1 ते 2 दिवसांनी तर काही प्लॅन्सची व्हॅलिडीटी 8 ते 10 दिवसांनी कमी झाली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाविरोधात ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
Ans: BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ही भारत सरकारची टेलिकॉम कंपनी आहे जी मोबाइल, ब्रॉडबँड, फाइबर इंटरनेट आणि लँडलाइन सेवा देते.
Ans: मोबाइल प्रीपेड/पोस्टपेड, Bharat Fiber (FTTH), लँडलाइन, ब्रॉडबँड, 4G/5G नेटवर्क सेवा, एंटरप्राइझ सोल्यूशन्स
Ans: जवळच्या BSNL Office मध्ये अर्ज करून किंवा ऑनलाइन बुकिंग करून इन्स्टॉलेशन मिळवता येते.