BSNL ची 4G-5G USIM सर्व्हिस लवकरच सुरू होणार! कोणत्याही अडचणीशिवाय युजर्स कुठेही बदलू शकतील सिम
नुकतेच प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतींमध्ये अफाट वाढ केली. रिचार्जच्या वाढत्या किमती बघत अनेक युजर्स आता BSNL कडे वळले आहेत. त्यामुळे याच संधीचा फायदा घेत आता BSNL युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. लवकरच BSNL 5G सेवादेखील सुरु करण्याची चर्चा आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने वर्षभरात नवीन 4G आणि 5G आणि युनिव्हर्सल सिम प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. या संदर्भात, दूरसंचार विभागाचे म्हणणे आहे की, लवकरच 4G-5G रेडी युनिव्हर्सल सिम (USIM) आणि ओव्हर-द-एअर (OTA) लाँच केले जाईल. स्वावलंबी भारत मिशन अंतर्गत बीएसएनएल आपल्या सेवेचा दर्जा सुधारत आहे. या संदर्भात, चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी काम केले जात आहे.
या प्लॅटफॉर्मसह, युजर्सना प्रादेशिक निर्बंधांशिवाय सिम कार्ड स्वॅप करण्याची सुविधा मिळते. म्हणजेच युजर्स हे सिम कुठेही ऍक्टिव्ह करू शकेल . टेलिकम्युनिकेशन डेव्हलपमेंट फर्म पायरो होल्डिंग्सने हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे.
हेदेखील वाचा – BSNL- Jio- Airtel: कोणाचे नेटवर्क तुमच्या क्षेत्रात अधिक मजबूत आहे? अशाप्रकारे माहिती करून घ्या
दूरसंचार विभागाने त्यांच्या अधिकृत X हँडलमध्ये या सेवेची माहिती दिली आहे. विभागाचे म्हणणे आहे की, 4G आणि 5G सेवा सुरू झाल्यानंतर युजर्सना कोणत्याही निर्बंधाशिवाय मोबाइल नंबर आणि सिम बदलण्याची सुविधा मिळेल.
BSNL ने देखील आपल्या अधिकृत X हँडलद्वारे या प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली आहे. BSNL ने माहिती दिली की, या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन चंदीगडमध्ये करण्यात आले आहे आणि तिरुचिरापल्ली/त्रिची, तमिळनाडू येथे त्रिची येथे आपत्ती रिकव्हरी साइटची स्थापना करण्यात आली.
कंपनीकडून या प्लॅटफॉर्मबद्दल असा दावा केला जात आहे की, संपूर्ण भारतातील नेटवर्कचा वेग आता आणखीन वेगवान होईल. तसेच कव्हरेजदेखील अधिक चांगले होईल. याशिवाय, हा प्लॅटफॉर्म नंबर पोर्टेबिलिटी आणि सिम स्वॅपिंग देखील सुलभ करेल.