Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL मुळे Jio ची डोकेदुखी वाढणार, स्वस्त रिचार्ज प्लॅन नंतर आता कंपनी लवकरच लाँच करणार परवडणारे स्मार्टफोन

स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या ऑफर नंतर आता BSNL ग्राहकांसाठी परवडणारे स्मार्टफोन लाँच करणार आहे. BSNL ची 4G सेवा वापरण्यासाठी महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याची आवश्यकता नाही. 4G आणि 5G नेटवर्क अपग्रेडसोबत, कंपनी स्पॅम फ्री नेटवर्कवर काम करत आहे. लवकरच कंपनीचे 5G नेटवर्क देखील सुरू होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 03, 2024 | 08:29 AM
BSNL मुळे Jio ची डोकेदुखी वाढणार, स्वस्त रिचार्ज प्लॅन नंतर आता कंपनी लवकरच लाँच करणार परवडणारे स्मार्टफोन

BSNL मुळे Jio ची डोकेदुखी वाढणार, स्वस्त रिचार्ज प्लॅन नंतर आता कंपनी लवकरच लाँच करणार परवडणारे स्मार्टफोन

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ने इतर टेलिकॉम कंपन्याच्या तुलनेत स्वस्त रिचार्ज प्लॅन अजूनही सुरू ठेवले आहेत. त्यामुळे अनेक युजर्स Jio, Airtel आणि VI सोडून BSNL कडे वळले. स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या ऑफर नंतर आता कंपनी ग्राहकांसाठी परवडणारे स्मार्टफोन लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने कार्बन मोबाईलसोबत भागीदारी केली आहे. कार्बन आणि BSNL संयुक्तपणे 4G कनेक्टिव्हिटीसह फीचर फोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

हेदेखील वाचा- Apple ग्राहकांसाठी घेऊन येतंय एक स्पेशल सरप्राईज, लवकरच ‘हे’ डिव्हाईस होणार लाँच

कार्बन आणि BSNL च्या 4G कनेक्टिव्हिटी फीचर फोननंतर ग्राहकांना 4G सेवा वापरण्यासाठी महागड्या टच फोनची गरज भासणार नाही. या फीचर फोनसह BSNL रिलायन्स Jio च्या भारत 4G फोनला टक्कर देईल. भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi (Vodafone-Idea) ने रिचार्ज प्लॅनच्या दरात वाढ केल्यानंतर BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) युजर्समध्ये खूप लोकप्रिय होत आहे. मोठ्या संख्येने युजर्स त्यांचे सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करत आहेत. सरकारी कंपनीच्या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनमुळे तसेच 4G नेटवर्क सुरू झाल्यामुळे युजर्स BSNL कडे वळत आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

With the signing of a landmark #MoU, #BSNL and #KarbonnMobiles to introduce an exclusive SIM handset bundling offer under the Bharat 4G companion policy. Together, we aim to bring affordable 4G connectivity to every corner of the nation.#BSNLDay #BSNLFoundationDay pic.twitter.com/M37lXjhaGP

— BSNL India (@BSNLCorporate) October 1, 2024

BSNL Jio ला टक्कर देणार

BSNL चे बहुतांश ग्राहक हे ग्रामीण भागातील आहेत. अशा परिस्थितीत कंपनी फीचर फोन लाँच करण्यासारखे महत्वाचे पाऊल उचलत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून या फीचर फोनबाबत माहिती देण्यात आली आहे. BSNL फोनची बाजारात थेट स्पर्धा Jio Bharat 4G शी असेल, जी स्वस्त दरात हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी देते.

हेदेखील वाचा- जगातील चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ति बनला Mark Zuckerberg, एवढ्या संपत्तीसह केला विक्रम

कार्बनच्या फीचर मोबाइलसह, वापरकर्त्यांना BSNL ची 4G सेवा वापरण्यासाठी महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याची आवश्यकता नाही. BSNL सध्या वेगाने आपले नेटवर्क अपग्रेड करत आहे. देशभरात 4G नेटवर्क आणण्यासोबतच कंपनी अनेक ठिकाणी 5G ची चाचणी देखील करत आहे. त्यामुळे लवकरच कंपनीचे 5G नेटवर्क देखील सुरू होणार आहे.

स्पॅम मुक्त मोबाइल नेटवर्क

4G आणि 5G नेटवर्क अपग्रेडसोबत, कंपनी स्पॅम फ्री नेटवर्कवर काम करत आहे. यासाठी कंपनीने AI आधारित तंत्रज्ञान सादर करण्याची घोषणा केली आहे. BSNL ची ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तथापि, त्याची अधिकृत घोषणा इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 दरम्यान केली जाणारं असल्याचं सांगितलं जातं आहे. यावर्षी 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कंपनीच्या AI आधारित तंत्रज्ञान्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. BSNL च्या या घोषेनंतर सध्या ग्राहक BSNL फीचर फोन आणि AI आधारित तंत्रज्ञान्याची वाट पाहत आहेत. BSNL च्या स्वस्त रिचार्ज प्लॅननंतर आता BSNL चे परवडणारे 4G फीचर फोन देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरतील यात काही शंकाच नाही.

Web Title: Bsnl will launch reasonable phone after recharge plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 08:29 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.