जगातील चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ति बनला Mark Zuckerberg, 201 अब्ज डॉलर्ससह केला विक्रम
मेटा सीईओ Mark Zuckerberg आता 200 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. Mark Zuckerberg जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्याची एकूण संपत्ती 201 अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या या यादीत तीन जणांचा समावेश आहे. यामध्ये टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, ॲमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस आणि लुई व्हिटोचे संस्थापक आणि फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या नावांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा- आश्चर्यकारक! एयरपॉडसने शोधली चोरी झालेली करोडोंची फरारी, नेमकं प्रकरणं काय
ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, मेटा सीईओ Mark Zuckerberg ची एकूण संपत्ती 201 यूएस बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. यानंतर त्याचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे. या प्रवासापर्यंत पोहोचणे Mark Zuckerberg साठी सोपे काम नव्हते. या काळात त्याने अनेक चढउतारांचा सामना केला. तो आपल्या हेतूवर ठाम राहिला आणि पुढे जात राहिला. यानंतर त्याने हे स्थान मिळवले आणि आज तो 201 बिलियन डॉलर क्लबचा भाग बनला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Mark Zuckerberg आता जगातील चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. जर आपण 201 अब्ज डॉलर्स भारतीय चलनात रूपांतरित केले तर ही रक्कम अंदाजे 1,68,43,97,08,50,000 रुपये होईल. जर एखाद्या सामान्य माणसाला ही संपत्ती सांगितली, तर त्याला ही संपत्ती ऐकूण धक्का बसेल. मेटा प्लॅटफॉर्म्स इंकच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर Mark Zuckerberg ने हे स्थान मिळवले आहे. जानेवारी 2024 च्या तुलनेत मेटा शेअर्स 60 टक्क्यांनी महाग झाले आहेत. यामध्ये Meta AI चीही मोठी भूमिका आहे. यानंतर तो 200 अब्ज डॉलर क्लबमध्ये पोहोचला आहे. आता तो एलोन मस्क, जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्टच्या मागे आहे.
हेदेखील वाचा- Meta ने लाँच केलं अॅडवांस्ड स्मार्ट ग्लास Orion, होलोग्राफिक लेन्सने खरं दिसेल वर्चुअल जग
Mark Zuckerberg ने 2004 मध्ये फेसबुक सुरू केले. त्यानंतर हा प्रवास सुरूच राहिला आणि Mark Zuckerberg ने व्हॉट्सॲप मेसेजिंग ॲप विकत घेतले. हळूहळू तो फेसबुकशिवाय अनेक ॲप्सचा मालक बनला. यानंतर त्याने आपले सर्व प्लॅटफॉर्म नव्या नावाने समाविष्ट करण्याची योजना आखली. यानंतर, 2021 मध्ये मार्क Mark Zuckerberg ने मेटा प्लॅटफॉर्म इंक सुरू केले. सध्या मेटाच्या अनेक ॲप्सचे करोडो युजर्स आहेत. प्रत्येकजण त्यांच्या स्मार्टफोनमध्ये मेटा ॲप्सचा वापर करत आहे. याशिवाय कंपनीने मेटा AI देखील लाँच केलं आहे.
मेटाच्या ॲप्समध्येच AI चा समावेश करण्यात आला आहे. याचा फायदा म्हणजे युजर्सना AI चा वापर करण्यासाठी इतर कोणते ॲप फोनमध्ये इंस्टॉल करण्याची गरज लागत नाही. मार्क झुकरबर्गलाही मेटा AI चा फायदा झाला. मेटा कनेक्ट 2024 कार्यक्रमादरम्यान मार्क झुकरबर्गने त्याचा आगामी AI प्लॅन सादर केला आहे. याआधी, कंपनीने Meta AI लाँच केला आहे, जो WhatsApp सह अनेक प्लॅटफॉर्मवर आहे. Meta AI चे 50 कोटी मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.