Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर डाऊन प्रकरणी सीईओ सत्या नडेला यांचं मोठं वक्तव्य; X वर शेअर केली पोस्ट

मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम अनेक महत्त्वाच्या कामांवर झाला. या सर्व प्रकरणावर आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सत्या नडेला यांनी X अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. CrowdStrike अपडेटमुळे युजर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ समस्येला सामोरे जावं लागलं, असं मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. या बगमुळे जगभरातील कंपन्या, बँका, सरकारी कार्यालये आणि विमान कंपन्यांना फटका बसला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2024 | 09:13 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि संगणक काल 19 जुलै रोजी ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले होतो. MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप काम कराताना अचानक क्रॅश झाले. त्यामुळे युजर्सना त्यांच्या लॅपटॉपवर एक निळी स्क्रिन दिसत होती. यामध्ये सांगितलं होतं की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रोसेसला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ(बीएसओडी) असं नाव देण्यात आलं होतं. अनेक युजर्सनी या निळ्या स्क्रीनचे फोटो त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केले. एवढेच नाही तर मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम विमानसेवेवर देखील झाला. इंडिगो एअरलाइन्सची सुमारे 200 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

हेदेखील वाचा-इअरबड्समध्ये पाणी गेलंय का? ‘या’ ट्रीकचा वापर करून घरीच तुमचे इअरबड्स दुरुस्त करा 

आकासा, स्पाइसजेट या विमान कंपन्यांनी देखील लोकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सर्व्हरच्या बिघाडामुळे मोठ्या संख्येने प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते. सर्व्हरच्या बिघाडामुळे बँकांची कामं देखील ठप्प झाली होती. बँकेशी संबंधित कामासाठी गेलेल्या लोकांना सर्व्हरमधील बिघाडामुळे पुन्हा परतावे लागले. सर्व्हरमधील बिघाडामुळे स्काय न्यूज चॅनल ब्रिटनमध्ये बंद झाले होते. मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम अनेक महत्त्वाच्या कामांवर झाला. या सर्व प्रकरणावर आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सत्या नडेला यांनी त्यांच्या X अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Yesterday, CrowdStrike released an update that began impacting IT systems globally. We are aware of this issue and are working closely with CrowdStrike and across the industry to provide customers technical guidance and support to safely bring their systems back online.

— Satya Nadella (@satyanadella) July 19, 2024


पोस्टमध्ये म्हटलं आहे की, काल, CrowdStrike ने एक अपडेट जारी केलं ज्याने जागतिक स्तरावर IT प्रणालींवर परिणाम करण्यास सुरुवात केली. आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि युजर्सना त्यांची सिस्टम सुरक्षितपणे परत ऑनलाइन आणण्यासाठी आम्ही CrowdStrike आणि संपूर्ण टीमसोबत काम करत आहोत.

हेदेखील वाचा- Tata Play Binge ने लाँच केला अतिशय स्वस्त प्लॅन! युजर्सना मिळणार अनलिमिटेड फायदे

CrowdStrike अपडेटमुळे युजर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ समस्येला सामोरे जावं लागलं, असं मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. या बगमुळे लोकांच्या पर्सनल कॉम्प्युटरसोबतच जगभरातील कंपन्या, बँका, सरकारी कार्यालये आणि विमान कंपन्यांनाही याचा फटका बसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी ही समस्या सतत शेअर केली. जर तुमच्याही पर्सनल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथ समस्या निर्माण झाली असेल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक सूचना जारी होण्याची प्रतीक्षा करा. CrowdStrike सध्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे आणि लवकरच तुम्हाला अपडेट मिळेल.

मायक्रोसॉफ्ट डाऊनबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक निवदेन जारी केलं होतं. या निवेदनात म्हटलं होतं की, जागतिक आउटेजबाबत मंत्रालय मायक्रोसॉफ्ट आणि त्यांच्या भागीदारांच्या संपर्कात आहे. या आउटेजचे निराकरण करण्यासाठी अद्यतने जारी केली गेली आहेत. एक तांत्रिक सल्ला जारी केला आहे. या आउटेजमुळे NIC नेटवर्कवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Web Title: Ceo satya nadellas big statement on microsoft windows server down a post shared on x

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 09:13 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.