फोटो सौजन्य -iStock
पाऊस सुरु असताना हातात छत्री आणि फोन दोन्ही पकडणं कठीण होतं. त्यामुळे अशावेळी इअरबड्स चा वापर करणं फायदेशीर ठरत. इअरबड्समुळे आपला फोन देखील भिजत नाही आणि आपण व्यवस्थित छत्री पकडू शकतो. पण कधी इअरबड्सच ओले झाले तर काय करायचं? अनेकवेळा आपण पावसापासून आपला तर सुरक्षित ठेवतो पण इअरबड्स मात्र ओले होतात. इअरबड्समध्ये पाणी गेलं की ते दुरुस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे इअरबड्स घरीच दुरुस्त करू शकता. त्यामुळे तुमच्या दुरुस्तीचे पैसे देखील वाचतील.
इअरबड्स बंद करा
तुमच्या इअरबड्समध्ये पाणी गेलं असल्यास सर्वात आधी ते बंद करा. इअरबड्स लगेच बंद केल्यामुळे त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होण्याचा धोका टळतो. यानंतर संपूर्ण इअरबड्स कोरड्या कापडाने पुसून टाका आणि मोकळ्या जागेत सुकण्यासाठी ठेवा. यानंतर काही वेळातच इअरबड्स पुन्हा सुरु होतील.
हेदेखील वाचा- 12 कोटी रुपयांच्या स्मार्ट फोल्डिंग टीव्हीचा सर्वत्र डंका! फीचर्स ऐकूण व्हाल थक्क
तांदळाचा वापर करा
तुमचे ओले इअरबड्स सुकविण्यासाठी तांदूळ वापरावा. फोनमध्ये पाणी गेल्यावर लोक तांदळाच्या डब्यात सुकवण्यासाठी ठेवतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. तसेच तुम्ही तुमचे ओले इअरबड्स सुकविण्यासाठी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि तांदळाच्या डब्यात कमीतकमी 24-48 तास सोडा. यानंतर इअरबड्स पुन्हा सुरु होतील. तांदूळ ओलावा शोषण्यास मदत करतो. काही लोक ओले इअरबड्स सुकविण्यासाठी हेअर ड्रायर आणि मायक्रोवेव्ह सारख्या उष्णतेचा वापर करतात, जे योग्य नाही. यामुळे इअरबड्स कायमचे खराब होऊ शकतात.
हेदेखील वाचा- २०१८ साली फ्लिपकार्टवर ऑर्डर केली चप्पल; ६ वर्षांनंतरही डिलीव्हरी नाही
इअरबड्स शिवाय आपल्याला पावसाळ्यात इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घेणं देखील तितकेच महत्त्वाचे असते. पावसाळ्यात फोन, इयरबड्स, स्मार्टवॉच आणि लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची विशेष काळजी घ्यावी लागते. या वस्तू पाण्यापासून सुरक्षित न ठेवल्यास तुम्हाला हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत नक्की काय करावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घेण्यासाठी वॉटरप्रूफ बॅगचा वापर करू शकता. वॉटरप्रूफ बॅगमुळे तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल.
चांगल्या क्वालिटीच्या वॉटरप्रूफ बॅगमध्ये पाणी जाण्याचा धोका नसतो, त्यामुळे तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्यापासून सुरक्षित रहतात. बाजारत अगदी कमी किंमतीत तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या वॉटरप्रूफ बॅग मिळतात. पावसाळ्यात बाहेर जाण्यापूर्वी नेहमी तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि महत्त्वाच्या गोष्टी वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवा. ज्यामुळे त्या खराब होणार नाहीत, आणि तुम्ही दिर्घकाळ या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करू शकता. याशिवाय आपण ओल्या पृष्ठभागावर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवतो, त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्याच्या संपर्कात येतात आणि खराब होऊ शकतात. त्यामुळे याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.