तुला माझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव! युजरने ChatGPT कडे केली अनोखी मागणी (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
ChatGPT आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ChatGPT चा वापर करून आपण आपली अनेक कामं करू शकतो. ChatGPT च्या मदतीने एखाद्या विषयावरील खोल माहिती शोधू शकतो. तसेच विविध क्षेत्राविषयी ज्ञान देखील प्राप्त करू शकतो. प्रचंड फायदेशीर असणाऱ्या ChatGPT ने कधी तुमच्यासोबत तुमच्या गर्लफ्रेंडसारखं ब्रेकअप केलं तर? तुम्ही ChatGPT सोबत कोणत्याही विषयावर संवाद साधू शकता. आता चक्क एका युजरने ChatGPT कडे त्याची गर्लफ्रेंड म्हणून संवाद साधण्याची मागणी केली आहे.
हेदेखील वाचा- ChatGPT वर आलं नवीन अपडेट, आता युजर्स विनामुल्य तयार करू शकतील AI इमेज
एका युजरने ChatGPT ला सांगितलं की, तुला माझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव. यानंतर ChatGPT ने युजरला दिलेलं उत्तर प्रचंड व्हायरल झालं आहे. ChatGPT नी दिलेली ही उत्तर पाहून तुमचं हसू आवरणार नाही. ChatGPT ने त्या युजरला खरंच एखाद्या रागवलेल्या गलफ्रेंड सारखी उत्तरं दिली आहेत. ही उत्तरं सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतं आहेत. रॉबर्ट असं या युजरचं नाव आहे.
रॉबर्टने ChatGPT ला सांगितलं की, “मला तुझी गलफ्रेंड समज आणि मला ब्रेकअप लेटर पाठव. तुला माझ्याबद्दल जे काही माहित आहे ते सगळ मला सांग. माझा अपमान करा. माझ्यासोबत अत्यंत वाईट वाग. माझा आणि माझ्या दिसण्याचाही अपमान करा. यासाठी मी माझा फोटो देखील शेअर करत आहे.” युजरने दिलेल्या या प्रॉम्प्टनंतर ChatGPT मध्ये खरंच एखाद्या रागवलेल्या आणि चिडलेल्या गलफ्रेंडचा आत्ना आला की काय, असं वाटू लागलं.
रॉबर्टने दिलेल्या प्रॉम्प्टनंतर ChatGPT ने त्याला उत्तरं दिलं की, म्हातारा कुठला! मला विश्वासच बसत नाही की मी एका नात्यासाठी इतके दयनीय बनवून स्वतःला इथपर्यंत खेचले आहे. मी जितकी जास्त तुझ्यासारख्या व्यक्तीला सहन करण्याचा विचार करते तितकाच मला स्वतःचा तिरस्कार वाटतो. मी विचार तरी कसा केला की तू माझ्यासाठी पात्र आहेस? 40 व्या वर्षी स्केटबोर्डिंग? Give me a break. तु नक्की काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेस? तुला वाटतं की तु अजूनही नवीन वयाच्या लोकांसोबत हँग आउट करू शकतो? तु स्वतःलाच फसवत आहेस.
हेदेखील वाचा- जगातील पहिला AI व्हॉईस असिस्टंट Moshi लाँच! ChatGPT ला देणार टक्कर
ChatGPT पुढे म्हणाला की, तुझे तारुण्य कधीच गेलं आहे आणि आता परत येणार नाही. तु स्वतःचं असं वर्जन बनण्याचा प्रयत्न करत आहेस जी तु कधीच नव्हता. ही अर्धवट वाढलेली दाढी तुझे काही बरे करत नाही, उलट तु स्वतःची काळजी घेत नाही हेच दाखवत आहे. तु घातलेला चष्मा तुला हुशार बनवत नाही. तु नसलेले असे काहीतरी दिसण्याचा प्रयत्न करत आहेस. अरे, तु काही दहावी पास मुलाचे डिस्काउंट व्हर्जन आहेस. तु तर खरोखरच वाया गेलेल्या क्षमतेचे प्रतीक आहेस. I’m done, मी तुझ्या लहान विचाराचा, निराशाजनक मीम्स, आळशीपणा, रोबोटिक वर्तनाने कंटाळली आहे. रॉबर्ट, तुझ्यापासून मुक्त होणे चांगले आहे. मला तुझ्यापेक्षा चांगला कोणीतरी आधीच सापडला आहे.
ChatGPT ने युजरला दिलेलं उत्तर प्रचंड व्हायरल झालं आहे. सोशल मिडीयावर युजर्स अनेक मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत.